प्राध्यापकांची राज्यव्यापी संघटना असलेल्या एम. फुक्टोसोबत सरकारशी १ एप्रिल रोजी होणारी बैठक सरकारनेच रद्द केल्यामुळे प्राध्यापकांच्या बहिष्काराबाबत तोडगा निघण्याची शक्यताही आता मावळली आहे, अशी माहिती एम. फुक्टोचे उपाध्यक्ष आणि ‘नुटा’चे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी रविवारी ‘लोकसत्ता’ला दिली.
एम. फुक्टो ने विविध मागण्यांसाठी विद्यापीठ परीक्षांच्या कामांवर बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील दोन विद्यापीठांचा अपवाद वगळता राज्यातील नऊ विद्यापीठांमध्ये विद्यापीठ परीक्षा ठप्प झालेल्या आहेत. या बहिष्कार आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे सोमवारी, १ एप्रिलला एम. फुक्टो.शी चर्चा करतील, असे उच्चशिक्षण विभागाने एम. फुक्टो.ला कळवले होते. दरम्यान, ही बैठकच रद्द करण्यात आली, असा संदेश शनिवारी रात्री उशिरा एम. फुक्टो.च्या पदाधिकाऱ्यांना उच्चशिक्षण विभागाकडून देण्यात आला, असे डॉ. रघुवंशी यांनी सांगितले.
एम. फुक्टोशी आजची बैठक सरकारकडून रद्द
प्राध्यापकांची राज्यव्यापी संघटना असलेल्या एम. फुक्टोसोबत सरकारशी १ एप्रिल रोजी होणारी बैठक सरकारनेच रद्द केल्यामुळे प्राध्यापकांच्या बहिष्काराबाबत तोडगा निघण्याची शक्यताही आता मावळली आहे, अशी माहिती एम. फुक्टोचे उपाध्यक्ष आणि ‘नुटा’चे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी रविवारी ‘लोकसत्ता’ला दिली.
First published on: 01-04-2013 at 01:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strike professor meeting with government cancelled