सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बिगरमोसमी पावसाचे आगमन दमदार झाले आहे. पहिल्याच दिवशी सर्वत्रच दमदार पाऊस कोसळला, पण बुधवारी देवगडला पावसाने हुलकावणी दिली. गुरुवारी सर्वत्र पाऊस कोसळला. आजपर्यंत जिल्ह्य़ात ४९७ मि.मी. सरासरी ६२ पाऊस कोसळला. जिल्ह्य़ात देवगड वगळता गुरुवारी सकाळी ८ वा. १२० मि.मी. पाऊस कोसळला. दिवसभर पावसाने हंगामासारखे रूप धारण केले होते. विजेच्या कडकडाटाने काही ठिकाणी वीजही गायब झाली. आजपर्यंत सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात १९१ मि.मी. एवढा नोंदला आहे. आजपर्यंत प्रत्येक तालुक्यात नोंदलेला पाऊस दोडामार्ग २० मि.मी., सावंतवाडी २१ मि.मी., कुडाळ ६२ मि.मी., वेंगुर्ले ७६ मि.मी., मालवण ४९ मि.मी., कणकवली ६५ मि.मी., देवगड १५ मि.मी., तर वैभववाडी १९१ मि.मी. मिळून सरासरी ६२ म्हणजेच ४९७ मि.मी. एवढा पाऊस जिल्ह्य़ात कोसळला असल्याचे सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strong rain arrive at sindhudurg