विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांकडे शासकीय अधिकाऱ्यांचे कमालीचे दुर्लक्ष झाले असून शहापुरातील सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसह आरपीआयचे पदाधिकारी शहापूर तहसील कार्यालयासमोर आज उपोषणास बसले आहेत.
शहापुरातील भातसा वसाहत परिसरात असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात आठवीपासून पुढे आयटीआय, पदवीपर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी राहत आहेत. शासनाचे नियम धाब्यावर बसवून या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य या सुविधांपासून वंचित ठेवून शासनाकडून आलेल्या निधीचा गैरव्यवहार केला जात असल्याचा आरोप आरपीआयचे विनोद थोरात यांनी केला आहे. या वसतिगृहासह स्वच्छतागृहाची साफसफाई केली जात नसल्याने दर्ु्गधी पसरली असून त्यांना मलेरिया, टायफॉईड यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण, दूध, मटण, अंडी, फळे मिळत नसल्यामुळे ते वसतिगृह सोडून जाण्याच्या मन:स्थितीत असल्याचे थोरात यांचे म्हणणे आहे. याशिवाय वसतिगृहाच्या अधीक्षकांना निलंबित करणे, सर्व कर्मचाऱ्यांना बदल्या करून त्यांच्यावर कडक कारवाई करणे, वसतिगृहाची संपूर्ण साफसफाई करणे किंवा दुसऱ्या जागेवर स्थलांतरित करणे, मेस सिस्टीम सुरू करणे, जुलै २०११ ते जुलै २०१२पर्यंतचा मासिक निर्वाह भत्ता त्वरित देणे आदी मागण्या विद्यार्थी व आरपीआयच्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा