सोलापूर : विद्यार्थी वसतिगृहात वारंवार छेड काढणाऱ्या एका १४ वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याला त्याच्याच समवयस्क विद्यार्थ्याने चाकूने पोटात भोसकल्याची धक्कादायक घटना अकलूज येथे घडली. या हल्ल्यात संबंधित विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वसतिगृहाच्या अधीक्षकाने दिलेल्या फिर्यादीनुसार हल्लेखोर मुलाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा अकलूज पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विजय विद्यार्थी वसतिगृहात घडलेल्या या घटनेची पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नाताळची सुट्टी असल्यामुळे सर्व मुले वसतिगृहात होती. रात्री सर्व मुले जेवण आणि अभ्यास करून आपापल्या खोलीत झोपली होती. यातील जखमी विद्यार्थी या वसतिगृहात एका खोलीत झोपला होता. वसतिगृह अधीक्षक आपल्या खोलीत झोपले होते. तेव्हा पहाटे तीनच्या सुमारास जखमी मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत वसतिगृह अधीक्षकांच्या खोलीत आला. त्याने आपणांस कोणीतरी व्यक्तीने चाकूने भोसकल्याचे सांगितले. त्याला तत्काळ अकलूजच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती वसतिगृह अधीक्षकांनी संस्थेच्या सचिवांना आणि पोलिसांना कळविली.

हेही वाचा >>>डॉ. मनमोहन सिंग यांचा सुवर्णकाळ : पृथ्वीराज चव्हाण

दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास वसतिगृहातून एक मुलगा पळून जात असताना त्यास पकडण्यात आले. चौकशी केली असता त्याने आपणच जखमी मुलास चाकूने भोसकल्याचे कबूल केले. जखमी मुलगा हा गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वसतिगृहात येता जाता इतर मुलांच्या समोर त्याला ‘बेस्ट टॉयलेट सर्व्हिस’ असे बोलून छेडायचा. त्यामुळे संशयित हल्लेखोर त्याच्यावर चिडून होता. मात्र, त्याने याबद्दल विद्यार्थी वसतिगृह प्रशासनाकडे एकदाही तक्रार नोंदविली नव्हती. त्याने आपणांस त्रास देणाऱ्या मुलाचा काटा काढण्याचा डाव रचला. त्याचाच भाग म्हणून त्याने गुपचूपपणे आपल्या खोलीत चाकू आणून ठेवला. जखमी मुलगा आपल्या खोलीत एकटाच झोपण्याची संधी साधून हल्लेखोर मुलाने पहाटे तीनच्या सुमारास त्याच्या खोलीत घुसून जखमी मुलावर, तो झोपेत असताना चाकूने थेट हल्ला केला. पोटात चाकू भोसकला गेल्याने तो गंभीर जखमी झाल्याचे वसतिगृह अधीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.