शहापूर तालुक्यातील सुसरवाडी या शासकीय आश्रमशाळेतील एका आदिवासी विद्यार्थ्यांला पोटदुखीचा किरकोळ त्रास होऊ लागल्याने कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेत असतानाच रस्त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला असून तेथे तज्ज्ञ डॉक्टर इन कॅमेरा शवविच्छेदन करणार आहेत, अशी माहिती शहापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश म्हस्के यांनी दिली.
सोमवारी पहाटे अचानक गुरुनाथच्या पोटात दूखू लागले व त्याला उलटय़ा, जुलाबाचा त्रास होऊ लागला होता, अशी माहिती डॉ. वाघमारे यांनी दिली.
या विद्यार्थ्यांच्या पालकाला ७५ हजार रुपयांचे अनुदान तात्काळ मंजूर करण्यात आल्याचे शहापूरचे प्रकल्पाधिकारी किरण माळी यांनी सांगितले.