लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील तब्बल २४३ विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात मुलांवर उपचार करण्यात आले असून, बहुतांश विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली.

Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
buldhana students hospitalized loksatta
बुलढाणा : शेगाव गतिमंद विद्यालयातील १४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; एकाचा मृत्यू
Cash worth Rs 3 lakh stolen from school on Law College Road Pune news
पुणे: विधी महाविद्यालय रस्त्यावरील शाळेतून तीन लाखांची रोकड चोरी
Three-year-old boy trapped in gallery after window locked
बुलढाणा : आई बाहेर, चिमुकला गॅलरीत ‌‌अन् ‘फ्लॅट’चे दार ‘लॉक’…
part of house collapse in Jogeshwari, house Jogeshwari,
जोगेश्वरीत घराचा भाग कोसळून पाच जण जखमी
amravati food poison news in marathi
अमरावती : धक्कादायक! शंभरावर कामगारांना विषबाधा, गोल्डन फायबर कंपनीत…
Committee to investigate Eklavya School case takes note of student protest
एकलव्य शाळेतील प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती, विद्यार्थी आंदोलनाची दखल

केकत जळगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी पोषण आहारात आच्छादन निघालेली खुली बिस्किटे देण्यात आली होती. ही बिस्किटे खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, चक्कर आदी आरोग्यविषयक त्रास जाणवत असल्याचे समोर आले. याची माहिती पालकांपर्यंत पोहोचल्यानंतर काही जणांनी तत्काळ शाळेत मिळेल त्या वाहनाने धाव घेतली.

आणखी वाचा-पद्मश्री राहीबाईं पोपरे यांची बीज राखीच्या रूपाने आनोखी भेट…

आपल्या पाल्यांना उपचारासाठी पैठण तालुक्यातील पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदिप काळे, प्राथमिक आरोग्य केंद्र नांदरचे डॉ. संदिप रगडे आदींसह खाजगी डॉ. जुबेर पटेल, विकास चावरे, डॉ. नरवडे यांनी उपचार सुरु केले. या घटनेची माहिती पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे, पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरदचंद्र रोडगे घटनास्थळी दाखल झाले.

Story img Loader