शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत सरकारकडून मिळणाऱ्या सोयी सुविधांकरता सरकारच जनतेच्या दारी जात आहे. परंतु, या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत असल्याचा दावा राष्ट्र्वादी पक्षाचे राहुरी येथील आमदार प्राजक्त तानपुरे यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी एक व्हिडीओच ट्विटरवरून शेअर केला आहे.

“‘शासन आपल्या दारी’ या शासनाच्या अतिरंजित उपक्रमामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे, विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. आज सकाळी हे विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्ये जाण्यासाठी पायपीट करताना दिसले”, असा दावा प्राजक्त तानपुरे यांनी केला आहे.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या

हेही वाचा >> मुंबईत गटारांवरील ४०० झाकणं गायब, भंगार विक्रेत्यांना पालिकेची तंबी

“सर्व एस टी बसेस मुख्यमंत्री महोदयांच्या सेवेसाठी तैनात आहेत. यांच्याकडून कार्यक्रमासाठी गर्दी जमेना म्हणून खूप दुरून लोकं आणावी लागत आहेत, असे ऐकले. असो, त्यांना कार्यक्रमासाठी आणि भवितव्यासाठी शुभेच्छा!” असंही प्राजक्त तानपुरे म्हणाल.

दरम्यान, ठिकठिकाणी राज्य सरकारकडून शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवला जात आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांना लाभ मिळावा याकरता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विविध जिल्ह्यांमध्ये हजर राहत आहेत. या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरले जात असल्याचंही सांगण्यात येतंय.

आज शिर्डीत शासन आपल्या दारी

आज (१७ ऑगस्ट) अहमदनगर येथील शिर्डी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तारीख उपलब्ध होत नसल्याने या कार्यक्रमाला मुहूर्त मिळत नव्हता. परंतु, अखेर आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डी येथील काकडी विमानतळ परिसरात हा कार्यक्रम होणार आहे.

Story img Loader