पुणे-बंगळुरु महामार्गावरील तासवडे टोलनाक्याजवळ कॉलेजच्या सहलीची बस आणि उसाच्या ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाले असून २२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील परिक्रमा इंजिनिअरींग महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांची ही बस होती. सहलीवरुन गोव्याहून परतत असताना हा भीषण अपघात झाला. जखमींवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सरु असून तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
विद्यार्थी सहलीच्या बसला अपघात, तीन ठार
इंजिनिअरींग महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांची बस होती.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 14-02-2016 at 13:47 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students picnic school bus accident 3 dead