नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे निकाल लांबणीवर पडण्याचे सत्र सुरूच आहे.उमेदवारांकडून सातत्याने या परीक्षांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी होत आहे. आता मात्र उमेदवारांमध्ये नाराजी वाढू लागली असून पुढील तीन-चार दिवसांत निकाल जाहीर न केल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा स्टूडंट्स राईट्स असोसिएशनने आयोगाला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

असोसिएशनचे महेश बडे व किरण निंभोरे यांनी आयोगाच्या सचिवांना पत्र पाठवून निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२२, संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब आणि क – २०२३ व राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ यांचे निकाल मागील काही महिन्यांपासून रखडलेले आहेत. निकाल कधी घोषित केले जाणार आहेत, या प्रतिक्षेत हजारो युवक आहेत.

हेही वाचा >>>एसटीचे ४५ आगार पूर्णत: बंद; मराठा आंदोलनाची सर्वाधिक झळ ‘या’ जिल्ह्याला…

उमेदवारांना पुढील परीक्षांचे नियोजन देखील करायचे आहे. तसेच उमेदवारांचा आर्थिक नुकसान देखील होत आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर तीनही निकाल घोषित करावेत, अशी विनंती असोसिएशनने पत्राद्वारे केली आहे. निकाल प्रसिद्ध करण्यास विलंब होत असल्याने उमेदवारांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे आम्ही सर्व जण पुण्यात मोठे आंदोलन उभे करणार असल्याचेही असोसिएशनने स्पष्ट केले आहे.