फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एअरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, यावरून राज्यााचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.
हेही वाचा – ‘कटुता संपवाच’, ठाकरे गटाकडून फडणवीसांना आवाहन; म्हणाले “विषाला ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा…”
नेमकं काय म्हणाले सुभाष देसाई?
”मागील तीन महिन्यांत महाराष्ट्राला तीन मोठे धक्के सहन करावे लागले आहे. यापूर्वी वेदान्त फॉक्सकॉन आणि रायगड येथे होणारा बल्क ड्रग्ज पार्क महाराष्ट्रापासून हिरवून घेण्यात आला होता. आता टाटा-एअरबसचा प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आला आहे. २२ हजार कोटींची गुंतवणूक करणारा हा प्रकल्प होता. हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. त्याची प्रक्रियाही व्यवस्थित सुरू होतील. मात्र, काल अचानक हा प्रकल्प गुजरात जाणार असल्याची घोषणा झाली. राज्यातील सरकार बदलल्यानंतर गेल्या तीन महिन्यात हे निर्णय झाले आहेत. विशेष म्हणजे हे प्रकल्प नेमके गुजरात या एकाच राज्यात गेले आहेत, हा केवळ योगायोग आहे का?” असा प्रश्न माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विचारला आहे.
हेही वाचा – बच्चू कडू-रवी राणा वादावरून एकनाथ खडसेंची शिंदे गटावर खोचक टीका; म्हणाले, “बच्चू कडूंच्या माध्यमातून…”
”महत्त्वाचे म्हणजे हे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर या प्रकरणावर राज्य सरकार केंद्र सरकारविरोधात शब्द सुद्धा बोलत नाही. महाविकास आघाडी सरकारला दोष देण्यापलीकडे या सरकारने कोणतंही काम केलं नाही”, असेही ते म्हणाले. तसेच ”महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेण्यासाठीच राज्यात शिंदे फडणीस सरकार आणल्या गेले असावे”, असा आरोपाही देसाई यांनी केला.
हेही वाचा – ‘टाटा एअरबस’ प्रकल्पावरून होणाऱ्या टीकेला मंत्री उदय सामंतांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “विरोधात असताना…”
”ही मोठी गुंतवणूक राज्यातून गेली याचं वैश्यम वाटत असून राज्यातील युवकांची रोजगाराची मोठी संधी हिरावण्यात आली, याचे दुख: वाटतं आहे. असे मोठे प्रकल्प जर आपल्या राज्यातून गेले तर विद्यापीठ, आयटीआय सारख्या संस्थांमधून उत्तम शिक्षण घेऊन निघणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्याचे उंबरठे झिझवावे लागतील”, असेही ते म्हणाले.