मागील अनेक वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी राज्य सरकारने वेळोवेळी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केलेला आहे. मात्र केंद्राने अद्याप मराठीला अभिजात भाषा म्हणून जाहीर केलेले नाही. असे असताना आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुन्हा एकदा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. यावर अमित शाह यांनी मी स्वतः यात लक्ष घालतो, असे आश्वासन दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> VIDEO: नाशिकमध्ये नियंत्रण सुटल्याने वाहन २०० फूट दरीत कोसळले, एकाचा मृत्यू, दोन जण जखमी

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई दीव येथे आयोजित पश्चिम भागातील राज्यांच्या परिषदेत आज सहभागी झाले होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या बैठकीत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी मागणी सुभाष देसाई यांनी केली. अभिजात भाषेचे सर्व निकष मराठीने पूर्ण केले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने विलंब करू नये असा आग्रह सुभाष देसाई यांनी धरला. तसेच मराठी माणसांनी राष्ट्रपती महोदयांना आजपर्यंत एक लाख वीस हजार पत्रे लिहिली आहेत, अशी आठवणही सुभाष देसाई यांनी अमित शाह यांना करुन दिली. तर सुभाष देसाई यांच्या या मागणीनंतर मी स्वतः यामध्ये लक्ष घालून विषय मार्गी लावण्याचे प्रयत्न करेन असे आश्वासन अमित शाह यांनी देसाई यांना दिले आहे.

Weather Forecast : मुंबईत मान्सूनचे आगमन, ठाण्यापासून पुण्यापर्यंत पावसाच्या सरी; जाणून घ्या हवामान विभागाचा ताजा अंदाज

या परिषदेस गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच दिव दमणचे प्रशासक प्रफुल्ल पटेल इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सुभाष देसाई यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली.

हेही वाचा >>> विकास निधीवरून अपक्ष आमदारांना शिवसेनेच्या धमक्या; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले…

दरम्यान, आतापर्यंत तमिळ, संस्कृत, मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि ओडिया या सहा भाषांना हा दर्जा मिळाला आहे. तर ‘रंगनाथ पठारे समिती’ने तयार केलेल्या अहवालात मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी शिफारस करण्यात आली आहे. मात्र याला ७ वर्षे उलटून गेली असून अद्याप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही.