महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुधाकर खाडे यांना विना परवाना परदेशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर बाळगल्याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाने अटक केली. खाडे याच्याकडून पाच जिवंत काडतुसेही हस्तगत करण्यात आली आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अवैध शस्त्रास्त्र प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी विशेष पथकाला दिले होते. या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी खाडे यांच्या घरी छापा टाकून तपासणी केली असता परदेशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व पाच जिवंत काडतुसे मिळून आली. त्याची किंमत ४ लाख ५० हजार रुपये असून या हत्याराचा परवानाही खाडे यांच्याकडे नसल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा