सांगली : निवडणूक लढविण्यास इच्छुक नसताना आमदार सुधीर गाडगीळ यांना भाजपने उमेदवारी जाहीर करताच अन्य इच्छुकांमधून काहीशी नाराजी व्यक्त होत आहे. ही नाराजी दूर करण्याचे प्रयत्न पक्षीय व आमदार गाडगीळ यांच्याकडून सुरू आहेत. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवारीचा वाद दिल्लीदरबारी पोहोचला आहे.

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीमध्ये विद्यमान आमदार गाडगीळ यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. त्यांनी निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कळविले होते. तरीही पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर झाले. गेल्या पंधरा दिवसांपासून विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गाडगीळ पुन्हा सक्रिय झाले असल्याचे दिसले होते. तरीही उमेदवारीची संधी गाडगीळांनी नकार दिल्याने आपल्यालाच मिळेल या आशेवर इच्छुक होते. मात्र, पहिल्या यादीतच गाडगीळांचे नाव जाहीर झाल्याने इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Pankaja Munde and Dhananjay Munde vs Suresh Dhas new controversy on political stage after elections
मुंडे बहीण-भाऊ विरुद्ध सुरेश धस, निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नवा वाद
Two arrested in Solapur for vandalizing ST bus
एसटी बसची नासधूस; सोलापुरात दोघांना अटक
nitin raut Devendra fadnavis
गुंडांना खुद्द मुख्यमंत्र्यांचे संरक्षण, डॉ. नितीन राऊत म्हणाले…
शहांच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद
Inquiry into cases in Beed Parbhani through retired judges Nagpur news
बीड, परभणीतील प्रकरणांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
Nagpur Winter Session Anil Parab, kalyan Marathi Family case , Anil Parab,
‘मुंबई आपल्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, सभागृहात काय घडले…

हेही वाचा >>>MVA Seat Sharing : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटला? रमेश चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती

भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, पृथ्वीराज पवार, नितीन शिंदे, स्वाती शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील आदींनी उमेदवारीची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मागणी पक्षाकडे केली होती. इनामदार यांनी गेल्यावेळीही उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र यावेळी आपल्या नावाचा प्राधान्याने विचार केला जाईल अशी अटकळ बांधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातूनही त्यांनी प्रयत्न केले. मात्र, हे प्रयत्न अयशस्वी ठरले. तर डोंगरे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते.

हेही वाचा >>>Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले…

इनामदार यांनी आपण कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून पुढील भूमिका स्पष्ट करू, असे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. तर मैदानात न उतरण्याचा निर्णय जाहीर करूनही पक्षाने पुन्हा गाडगीळ यांना संधी दिली हे कार्यकर्त्यांना मान्य झालेले नाही असे डोंगरे म्हणाले. येत्या एक दोन दिवसांत उमेदवारी दाखल करण्याबाबत निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.

उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भाजपच्या किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी मात्र उमेदवारी जाहीर होताच, आमदार गाडगीळ यांची भेट घेऊन अभिनंदन करत पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी आपण बांधील असल्याचे सांगितले.

Story img Loader