Sudhir Mungantiwar On Ajit Pawar : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधीनंतर हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. दरम्यान हिवाळी अधिवेशन सुरू असताना आज नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचे बैद्धिक होणार आहे. यासाठी सकाळपासूनच महायुतीचे आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान उमुख्यमंत्री अजित पवार या बैद्धीकासाठी रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेलेले नाहीत. याबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना विचारणात आले होते. त्यावेळी मुनगंटीवार यांनी, “या प्रश्नाचं उत्तर अजितदादच देऊ शकतील”,असे म्हटले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार रेशीमबागेत येणार का?
आज महायुतीच्या आमदारांचे रेशीमबागेत बौद्धीक होणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित राहिले आहेत. मात्र त्यांच्या पक्षाचे एकमेव आमदार राजू कारेमोरे या बौद्धिकासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पोहचले आहेत. यावर आज माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना, अजित पवार रेशीमबागेत येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, “अजित दादांना निमंत्रण दिले की नाही याबाबत मला माहिती नाही. म्हणून मी यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. अजितदादा इथे का आले नाहीत, याचे उत्तर मी कसे देऊ. हे अजितदादाच सांगतील.”
हे ही वाचा : “लिव्ह-इन रिलेशनशिप आणि समलैंगिक विवाहामुळे सामाजिक व्यवस्था कोसळेल”, नितीन गडकरींचे मोठे विधान
मंत्रिपदाबाबत मुनगंटीवारांची प्रतिक्रिया
नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत प्रश्न विचारला असता मुनगंटीवार म्हणाले, “मी याबाबत कोणाशीही चर्चा केलेली नाही. हा चर्चेचा कालावधी नाही.”
हे ही वाचा : मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा उभारण्याची हालचाल सुरू
राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे रेशीमबागेत दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धीकाला जाणार का, अशा चर्चा असताना भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मंतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे रेशीमबागेत दाखल झाले आहेत. टीव्ही ९ मराठीशी बोलताना राजू कारेमोर यांना अजित पवार रेशीमबागेत येणार का नाही याबाबत विचारण्यात आले. त्यावर कारेमोरे यांनी याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले.