मणिपूरहून निघालेल्या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा रविवारी (१७ मार्च) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील जाहीर सभेने समारोप झाला. या निमित्ताने विरोधकांच्या इडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. मणिपूरमधून निघालेली राहुल गांधी यांची यात्रा दोन महिन्यांनंतर सुमारे ६,७०० किलोमीटरचा प्रवास करून मुंबईत दाखल झाली. त्यानंतर मुबईच्या शिवाजी पार्कवर या यात्रेचा समारोप करण्यात आला. शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जाहीर सभा घेतली. या सभेला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यापासून ते शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांपर्यंत अनेक मोठे नेते उपस्थित होते.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील या सभेला संबोधित केलं. यावेळी भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा उल्लेख केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी, “जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त, देशप्रेमी बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो…” अशी हाक देत भाषणाला सुरुवात केली. परंतु, उद्धव ठाकरे एरवी “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो…” अशी हाक देत भाषणाला सुरुवात करतात. उद्धव ठाकरे यांच्या याच बदलेल्या कृतीवरून त्यांच्यावर भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून टीका होत आहे.

What Uddhav Thackeray Said About Raj Thackeray ?
Uddhav Thackeray : “राज ठाकरेंशी युती करणं शक्यच नाही, महाराष्ट्र द्रोही..”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!
Uddhav Thackeray Speech in Ausa Latur
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका, “महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण..”
raj thackeray on shivaji park light cut,
पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी शिवतीर्थावरील दीपोत्सवाचे कंदील काढल्याने राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, “हिंदुत्त्ववादी विचारांचे…”
Bala Nandgaonkar Statement on Uddhav and Raj Thackeray
Bala Nandgaonkar : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंशी असलेलं रक्ताचं नातं जपावं, अजूनही..”, कुठल्या नेत्याने केली विनंती?
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”

राज्याचे सांस्कृतिक मंत्री आणि भाजपाचे लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील या कृतीवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुनगंटीवार म्हणाले, असंगाशी संग केल्यावर आणखी काय होणार? हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो…” अशी हाक देत भाषणाची सुरुवात करायचे. परंतु, उद्धव ठाकरे यांना त्याचा विसर पडलेला दिसतोय. काँग्रेससह इतरांशी संगत केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना त्यांची भाषा बदलावी लागली.

हे ही वाचा >> “माझ्या देशाचं नाव बदलण्याचा प्रयत्न”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “हुकूमशाह कितीही मोठा असला तरी…”

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, मला काँग्रेसबरोबर जावं लागेल तेव्हा मी माझं दुकान बंद करेन. बाळासाहेबांच्या या वक्तव्याचा अर्थ उद्धव ठाकरे समजू शकले नाहीत. त्यांचं दुकान आता बंद व्हायला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या या कृतीला आपल्या तत्वचिंतनात असंगाशी संग म्हटलं जातं.