Premium

“मला तिकीट मिळू नये यासाठी प्रयत्न करतोय”, सुधीर मुनगंटीवार यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “लोकसभेत जाण्याची…”

सुधीर मुनगंटीवार संजय राऊतांबाबत म्हणाले, “त्यांची जीभ तर रोज घसरते. कधी उत्तर देताना एखादा शब्द इकडे-तिकडे झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणात हल्ली…!”

sudhir mungantiwar loksabha election 2024
सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं विधान! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

निवडणूक आयोगाकडून लवकरच लोकसभा निवडणुकांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये जागावाटप व उमेदवारीसाठी चर्चा-बैठकांचं सत्र चालू आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमधून महायुतीकडून सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. यासंदर्बात खुद्द सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र विरुद्ध मत व्यक्त केलं आहे. आपल्याला तिकीट मिळू नये, यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं मुनगंटीवार म्हणाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये लोकसभेत जाण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं आहे. “मला तिकीट कोणत्याही परिस्थितीत मिळू नये याचा मी पूर्ण प्रयत्न करतोय. शेवटी यश-अपयश परमेश्वराच्या हाती आहे. माझी इच्छा लोकसभेत जाण्याची नाही हे नक्की आहे. पण पक्षानं आदेश दिला तर त्यानुसार वागणं हे कार्यकर्ता म्हणून आमचं कर्तव्यच आहे”, असं सूचक विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रपुरात केलेली विकासकामेही सांगितली.

महायुतीचं जागावाटप ठरलं? अजित पवारांचं सूचक विधान; म्हणाले, “विद्यमान जागा त्या त्या पक्षाला…”

“पक्षानं आजपर्यंत या पदापर्यंत मला पोहोचवलं. राज्याच्या सेवेची संधी दिली. पण मी लोकसभेचं तिकीट नको असं म्हणतोय”, असं ते म्हणाले.

संजय राऊतांना टोला

दरम्यान, संजय राऊतांची जीभ रोजच घसरते असं म्हणताना मुनगंटीवार यांनी त्यांना टोला लगावला आहे. गिरीश महाजनांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना केलेल्या टीकेचा संदर्भ मुनगंटीवारांनी दिला. “संजय राऊतांची टीका निम्न दर्जाची असताना कधीकधी त्याचं उत्तर देताना तसंच खरमरीत उत्तर द्यावं लागतं. त्यांची जीभ तर रोज घसरते. कधी उत्तर देताना एखादा शब्द इकडे-तिकडे झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणात हल्ली त्याचं फार काही वैषम्य राहिलंय असं वाटत नाही”, असं ते यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sudhir mungantiwar not interested for loksabha election 2024 ticket from chandrapur pmw

First published on: 12-03-2024 at 10:01 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा