पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरात भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशभरातील विरोधकांवर हल्लाबोल केला. अनेक पक्षांवर घराणेशाहीचे आरोप केले. तसेच ज्या पक्षांमधील नेत्यांची अंमलबजावणी संचालनालय, आयकर विभाक किंवा सीबीआयकडून चौकशा सुरू आहेत, अशा पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही असाच आरोप केला होता. तसेच राष्ट्रवादीवर घराणेशाहीचा आरोप केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. असं एकही क्षेत्र नाही जिथे काँग्रेसने घोटाळा केला नसेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आता भाजपा कार्यकर्त्यांनी थोडे प्रयत्न करायला हवेत आणि या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांचा मीटर वाढवायला हवा (इतर घोटाळे बाहेर काढायला हवेत).
या आरोपांनंतर काही दिवसंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. पक्षातील वरिष्ठ नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधल्या अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन वेगळा गट बनवला. या गटासह त्यांनी भाजपाबरोबर युती केली तसेच ते महाराष्ट्रात सत्तेत सहभागी झाले. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांना मंत्रीपदं मिळाली. अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यापासून सातत्याने आरोप केला जात आहेत की, ईडीची चौकशी, सीबीआयची चौकशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच अजित पवार भाजपाबरोबर केले.
हे ही वाचा >> “इतके महिने उलटले तरी तुम्ही फक्त…”, आमदार अपात्रता प्रकरणावरून सरन्यायाधीशांचं राहुल नार्वेकरांच्या कारभारावर बोट
दरम्यान, विरोधकांकडून होत असलेल्या या आरोपांना भाजपा नेते आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे. मुनगंटीवार म्हणाले, अजित पवारांचा विषय कुठे आहे? अजित पवारांना यांनीच क्लीन चीट दिली आहे ना? त्याचे लाभार्थी कोण आहेत याची माहिती होईल. तुम्ही निवदेन तरी द्या. कधीकधी स्पष्टता असली तरी त्यात अस्पष्टता आहे असं दाखवल्याने समाज संघटित होतो असा भाव काही लोकांमध्ये असतो.