छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पुढील आठवड्यात १९ जुलै रोजी ही वाघनखं साताऱ्यातील संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचंही सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत जाहीर केलं. मात्र, लंडनच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याबाबत दावे करण्यात आले आहेत. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी याबाबत पत्रकार परिषदेत भूमिका मांडली होती. त्यावरून चर्चा सुरू असताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत याबाबत निवेदन केलं.

राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा शुक्रवारी शेवटचा दिवस असून विधानपरिषदेच्या ११ सदस्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडी एकीकडे घडत असताना दुसरीकडे छत्रपती शिवरायांच्या वाघनखांचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे होत आहेत. याबाबच राज्य सरकारकडून विधानसभेत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली असून ही वाघनखं शिवरायांचीच असल्याचं आमच्याकडे आलेल्या माहितीवरून स्पष्ट होत असल्याचं ते म्हणाले.

school Annual day function viral video
‘शाळेच्या त्या सोनेरी आठवणी…’ मैदानात सराव, मेकअपसाठी एकच फाउंडेशन अन् बरंच काही; VIRAL VIDEO पाहून आठवेल शाळेतला वार्षिकोत्सव
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Annual flower exhibition detail update
निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक
do you know which fort is this
हा कोणता किल्ला आहे, तुम्ही ओळखू शकता का? Viral Video एकदा पाहाच

ती वाघनखं छत्रपती शिवरायांचीच?

“अनेक शिवभक्तांची मागणी होती की अफजलखानाच्या कबरीजवळचं अतिक्रमण हटवावं. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी या दिवशी ते हटवण्याचा निर्णय झाला. १० नोव्हेंबर रोजी ते अतिक्रमण हटवलं. त्यानंतर शिवभक्तांनी वाघनखांची माहिती दिली. आपण त्यासंदर्भातला पत्रव्यवहार सुरू केला. ती वाघनघं शिवभक्तांच्या दर्शनासाठी द्यावीत असा पत्रव्यवहार पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान आणि त्या संग्रहालयाच्या प्रमुखांशी केला. त्यांचं उत्तर आलं. १८२५ रोजी बनवलेल्या डबीत ही वाघनखं ठेवली आहेत. त्या चित्रासह त्यांनी सर्व माहिती पाठवली”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. यासाठी अनेक शिवभक्तांनी माहिती देणारी टिप्पणं पाठवल्याचंही ते म्हणाले.

“तीन वर्षांसाठी वाघनखं महाराष्ट्रात राहणार”

“आम्ही माहिती घेतली की यासंदर्भात जगात इतरत्र कुठे काही उपलब्ध आहे का? इतर ठिकाणच्या पुराव्यांमध्येही माहिती देण्यात आली आहे. ही वाघनखं लंडनला गेल्यानंतर ब्रिटनमध्ये प्रदर्शनातही ठेवण्यात आली होती. १८७५ व १८९६ साली ही प्रदर्शनं भरवण्यात आली. त्यासंदर्भात तेव्हाच्या वर्तमानपत्रांतही बातम्या आल्या. त्यानुसार ही वाघनखं त्या संग्रहालयात असल्याचं सांगण्यात आलं. आपला पत्रव्यवहार पाहिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा वर्षभरासाठी ही वाघनखं दर्शनासाठी देऊ असं सांगितलं. पण आम्ही पुन्हा प्रयत्न केला. त्यानंतर तीन वर्षांसाठी वाघनखं आपल्याकडे राहतील असा निर्णय झाला”, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

“…म्हणून हा पळपुटेपणा शिंदे सरकारने केला आहे”, पुरवणी मागण्यांवरून जयंत पाटलांचं टीकास्र!

“१९ जुलैला हे वाघनख साताऱ्याच्या सरकारी म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व तिथले सरदार यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे”, असंही मुनगंटीवार म्हणाले.

वाघनखांवरील शंकांचं काय?

दरम्यान, वाघनखांवर उपस्थित करण्यात आलेल्या शंकांबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी भूमिका मांडली. “काही शंका उपस्थित केल्या. एक शंका होती की वाघनखं आणण्यासाठी भाडं दिलं जाणार आहे का? एक नवीन पैशाचं भाडं दिलं गेलेलं नाही. कुणीही तसं मागितलेलं नाही. वाघनखं आणण्यासाठी करोडो रुपये खर्च झाल्याचा दावा केला गेला. आपल्या एका दिवसाच्या अधिवेशनाच्या खर्चापेक्षाही कमी खर्च, म्हणजे जाणे-येणे आणि करार करणे यासाठी १४ लाख ८ हजार रुपये खर्च झाला. वाघनखं ठेवण्यासाठी ७ कोटींचा खर्च असल्याचा दावा केला गेला. पण हे असत्य आहे. या वाघनखासोबत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर सर्व शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन भरवत आहोत. त्यासाठी केलेला हा एकत्रित खर्च आहे”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

“हे छत्रपतींच्या राज्याभिषेकाचं ३५०वं वर्षच नव्हतं असं म्हटलं गेलं. पण २ जून आणि ६ जून २०२३ हा ३५० वा राज्याभिषेक होता आणि यावर्षी आपण साजरा केला तो ३५१ वा राज्याभिषेक होता.अनेक वाघनखं असल्याचं सांगितलं गेलं. पण १८२५ साली तयार केलेल्या डबीप्रमाणे इतर कोणत्याही वाघनखासाठी डबी तयार करण्यात आलेली नाही. त्याशिवाय इतर कुणीही दुसऱ्या वाघनखांबाबत छत्रपती शिवरायांची वाघनखं आहेत असा दावा केलेला नाही”, असंही ते म्हणाले.

Story img Loader