भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यांनी अजित पवारांचा उल्लेख ‘लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू’ तर सुप्रिया सुळेंचा उल्लेख ‘लबाड लांडग्याची लेक’ असा केला होता. या टीकेनंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा गोपीचंद पडळकरांनी पवारांवर टीकास्र सोडलं. महाराष्ट्रातला लांडगा कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे, अशी अप्रत्यक्ष टीका पडळकरांनी केली.

गोपीचंद पडळकरांच्या नव्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेबाबत विचारलं भाजपा नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भलतीच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेवर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. यावेळी मुनगंटीवार यांनी राज्यातील लुप्त होणाऱ्या लांडग्यांच्या प्रजातीच्या संरक्षणासाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पाची माहिती दिली.

Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Ajit Pawar Jayant Patil x
Jayant Patil : “अरे बाप नाही, तुझा काकाच…”, जयंत पाटलांचं अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
Woman wash hair with toxic foam in Yamuna river video viral
“अहो ताई, तो शॅम्पू नाही” यमुना नदीत महिलांचा किळसवाणा प्रकार; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी मारला कपाळावर हात
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण

हेही वाचा- “…ते तर तिथे बूट चाटत बसलेत”, साहेब, ताई, दादा म्हणत पडळकरांचा पुन्हा हल्लाबोल

महाराष्ट्रातला लांडगा कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे, या पडळकरांच्या टीकेबाबत विचारलं असता सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मला या टीकेवर बोलायचं नाही. पण आताच आमची वन्यजीव मंडळाची बैठक झाली. लांडग्याचं अस्तित्व धोक्यात आल्याने आम्ही लांडग्यांच्या संरक्षणासाठी प्रकल्प राबवत आहोत. लांडग्यांचं सरक्षण झालं पाहिजे. वनविभागात असणाऱ्या लांडग्यांच्या ज्या प्रजाती लुप्त होत आहेत, त्याबद्दल आताच आम्ही एक ठराव केला. ‘बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटी’बरोबर आम्ही ‘एमओयू’ करणार आहोत. या लांडग्यांचं अस्तित्व सुरक्षित राहावं. त्यांचं संवर्धन व्हावं. या अनुषंगाने आम्ही आताच निर्णय केला आहे.”