राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला. यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसाठी हा धक्कादायक निकाल आहे. परंतु भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, या निर्णयात धक्कादायक असं काहीच नाही. समजा परीक्षा देताना सहा पेपर द्यावे लागतात, आपण त्यापैकी दोनच पेपर दिले तर गुणपत्रिका नापसचीच येणार आहे. त्यामुळे या निकालाला धक्कादायक कसं म्हणणार.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुनगंटीवार म्हणाले की, आपल्या देशात कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी जे निकष आहेत त्यात एखाद्या पक्षाने किती राज्यांमध्ये निवडणूक लढवावी. किती राज्यांमध्ये किती टक्के मतं घ्यावी यासंबंधीचे निकष असतात. त्यावर ठरतं तुमच्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा द्यायचा की नाही. ही मतं घेतली नाही तर हा निर्णय धक्कादायक कसा काय? पेपर न देता मेरिटची गुणपत्रिका येणार आहे का? त्यामुळे या निकालात धक्कादायक असं काही नाही हा प्रक्रियेचा एक भाग आहे.

मुनगंटीवार म्हणाले की, त्यांनी निकष पूर्ण केले नाहीत तर राष्ट्रीय दर्जा राहणार नाही. उद्या त्यांनी कष्ट केले, मेहनत केली तर तो दर्जा परत मिळेल. पुन्हा राज्यांमध्ये लोकप्रियता मिळाली तर निकष पूर्ण होतील, अर्थात लोकप्रियता मिळणं त्यांच्यासाठी कठीण आहे.

हे ही वाचा >> “दही हंडी मंडळ ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना फक्त आश्वासनं”, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, म्हणाले, “केवळ फोटोसाठी…”

काय म्हणाले जयंत पाटील?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, “राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणत्या पक्षाला मिळेल याबाबत काही निकष आहेत. या निकषात प्रत्येक निवडणुकीत काही बदल होत असतात. आगामी काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये आमची कामगिरी सरस/समाधानकारक झाली तर हा दर्जा पुन्हा मिळू शकतो. त्यात मला फार अडचण वाटत नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar says ncp should work hard and will national party status asc