भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नातवासोबत वेळ घालवण्याचा संदर्भ देत केलेल्या टीकेवर भाष्य करताना मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे अडीच वर्षे मंत्रालयामध्ये गेले नव्हते, याबद्दल खडसे काही बोलले नाहीत अशा अर्थाचा टोला लगावला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी नातवाला वेळ देऊन कौटुंबिक जबाबदारी पार पडली. खासगी आयुष्याशी निगडीत टीका ही परंपरेला धरुन नाही असा टोलाही मुनगंटीवार यांनी खडसेंना लगावला.

नक्की वाचा >> ‘नायक’ चित्रपटाप्रमाणे महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार वेगाने निर्णय घेत आहे; भाजपा नेत्याचं वक्तव्य

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी सध्याच्या सरकारची स्थिती ही अतिदक्षता विभागातील रुग्णाप्रमाणे असल्याने ते मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाहीत अशी टीका केलीय. तसेच पालकमंत्री नसल्याने लोकांचे अश्रू पुसायला कोणी नाहीय. तसेच नाताबरोबर वेळ घालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे चार तास आहेत तर शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला त्यांच्याकडे वेळ नाही”, असा संदर्भ देत पत्रकारांनी मुनगंटीवार यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी, “महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा असणाऱ्या गडचिरोलीचा दौरा पहिलाच दौरा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आपला हा पहिलाच दौरा या नेत्यांनी पूर परिस्थितीची पाहाणी करण्यासाठी केला. त्यांनी तातडीने निर्णय घेतले,” असं सांगितलं.

नक्की वाचा >> शरद पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत निलेश आणि नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अजूनही…”

तसेच यावेळी मुनगंटीवार यांनी खडसेंवर टीका करताना त्यांनी, “आता या निर्णयांनंतर सुद्धा टीका होता आहे. काही लोकांचं समाधान आयुष्यभर होऊ शकत नाही. या सरकारवर टीका केल्यानंतरच आपलं पद हे जास्त स्थीर होऊ शकतं आणि आपल्याला नेते म्हणून मान्यता मिळू शकते ही भावना त्यांच्या मनात असावी. सरकार वेगाने काम करत आहे,” असं म्हटलं.

नक्की पाहा >> Photos: ‘मातोश्रीवर बोलवलं अन्…’, ‘बाळासाहेब असते तर..’, ‘हात जोडून विनंती केली पण…’; रामदास कदमांच्या हकालपट्टीचं कारण ठरलेलं पत्र

“नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय मागच्या सरकारमध्ये ६ मार्च २०२०, ८ मार्च २०२१ आणि ११ मार्च २०२२ ला पुन्हा तीच कॅसेट वाजवण्यात आली. जुनी रेकॉर्ड जशी अडकायची तसा प्रकार होता. या सरकारने निर्णय केला. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले. म्हणून मला असं वाटतं लोकांचे अश्रू पुसण्यामध्ये हा पुढाकार शिवसेना-भाजपाचं सरकार घेईल,” असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

नक्की वाचा >> “१२ नाही आमच्यासोबत एकूण…”; शिवसेना खासदारांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीत पोहचल्यानंतर मोठा गौप्यस्फोट

“या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात कौटुंबिक घटनेच्या आधारे भाष्य करणं हे राजकीय दृष्टीकोनातून परंपरेच्या विरुद्ध आहे. एखाद्या आईने मुलासाठी स्वयंपाक केला ही बातमी होत नाही. मुख्यमंत्री मंत्रालयात गेले ही बातमी होता कामा नये. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रंजल्या गांजल्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मुख्यमंत्री हे पद स्वीकारतात. मात्र दुर्देवाने महाराष्ट्रातील मुख्यमंत्री जसं काही त्यांचं मंत्रालयाशी शत्रुत्व असावं अशापद्धतीने ते मंत्रालयात गेले नाहीत. त्याबद्दल शब्द नाही. नातवाला घेऊन कुठं कौटुंबिक जबाबदारी पार पाडली तर त्यावर टीका करायची हे राजकीय प्रथा परंपरेला शोभत नाही,” असा टोला त्यांनी खडसेंना लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar slams khadse over his comment on cm eknath shinde also criticize ex cm uddhav thackeray for not visiting mantralaya scsg