माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल (शनिवार, ६ मे) रत्नागिरीतल्या बारसू येथे जाऊन रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेतली. हुकूमशाही पद्धतीने प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू, असा इशारा या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी सत्तधारी भाजपा-शिंदे गटाला दिला. ठाकरे यांनी शनिवारी राजापूर तालुक्यातील प्रस्तावित बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या परिसरातील कातळशिल्पांची देखील पाहणी केली. तसेच धोपेश्वर-गिरमादेवी कोंड येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनंतर सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गट त्यांच्यावर टीका करू लागला आहे. मुळात हा प्रकल्प बारसूत व्हावा असं पत्र उद्धव ठाकरे यांनीच दिलं होतं, अशी माहिती सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी यापूर्वी अनेकदा दिली आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, हे लोक (भाजपा – शिंदे गट) बारसूच्या प्रकल्पासाठी माझ्या नावाचं पत्र नाचवत आहेत, परंतु गद्दारांच्या रेट्यामुळेच मी ते पत्र दिलं होतं.

हे ही वाचा >> “१० जूनपर्यंत संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार” भाजपा आमदार नितेश राणेंचा दावा

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर आता सत्ताधाऱ्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाणार प्रकल्पाच्या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, यासाठी दुसरी पर्यायी जागा देऊ. मग त्यांनीच बारसू प्रकल्पासाठी पत्रं दिली, इथे प्रकल्प व्हावा अशी त्यांचीच सुचना होती. पण ते आता सत्तेतून गेले. आता त्यांना उपरती सुचली आहे. आता ते म्हणतात दुसऱ्यांनी मला सांगितलं म्हणून मी तसं केलं आणि पत्र दिलं. मुख्यमंत्रीपदावर असताना स्वतःच्या मर्जीने ते काम करू शकत नाहीत तर त्यांनी राज्याचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न करू नये.