राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. गोंदिया येथे पत्रकारांशी संवाद साधताना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार पक्ष सोडून गेल्यासाठी भारतीय जनता पार्टीला जबाबदार धरण्याच्या मुद्द्यावरुन मुनगंटीवर यांनी ठाकरेंना लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेऊन स्वत:चा घात करुन घेतल्याचं मुनगंटीवार म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंचा एक फोटो पाहून आपल्याला फार वाईट वाटल्याचंही ते म्हणाले.

नक्की वाचा >> “…त्यामुळे निवडणूक आयोगाला धनुष्यबाण आम्हालाच द्यावा लागेल”; ठाकरेंना ‘मशाल’ मिळाल्यानंतर CM शिंदेंचं विधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रकारांनी बंडखोरीसाठी ठाकरेंकडून भाजपाला दोष दिला जात असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारला असता मुनगंटीवार यांनी, “वैचारिक दृष्टीकोनातून ते एवढे कमकुवत होते का? भाजपाने आवाज दिला आणि तो आवाज ऐकून त्यांनी तुम्हाला सोडलं? असं होतं नाही. तुमचीही चूक आहे. तुम्ही काही निर्णय चुकीचे घेतले आहेत,” असं म्हटलं. त्याचप्रमाणे, “काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा तुमचा निर्णय आत्मघातकी होता. तुम्ही त्याबद्दल विचार करा ना,” असा सल्लाही मुनगंटीवार यांनी दिला.

नक्की वाचा >> शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवल्यासंदर्भात विचारलं असता रितेश देशमुख म्हणाला, “येणाऱ्या काळात जे घडणार आहे त्यावरुन आपल्याला…”

महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात सोनिया गांधीची भेट घेतल्याचा संदर्भही मुनगंटीवार यांनी दिला. “तुम्ही जाऊन सोनिया गांधींसमोर तुमच्या विचारांचा त्याग केला. उद्धव ठाकरे वाकून सोनिया गांधींना नमस्कार करत असल्याचा तो फोटो पाहून तर माझ्यासारख्याला फार वाईट वाटलं. त्या दिवशी मला फार दु:ख झालं,” असं मुनगंटीवार म्हणाले. इतरच नाही तर, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या घरी जन्माला आलेली उद्धव ठाकरेंसाठी व्यक्ती सोनिया गांधींना वाकून नमस्कार करते,” असा टोलाही त्यांनी लगावला.

नक्की वाचा >> “आदित्य ठाकरेंनी तत्काळ अंमलबजावणी करत बदलले पक्षाचे नाव”; मनसेनं शेअर केलेला स्क्रीनशॉट चर्चेत

नक्की वाचा >> शिवसेना अन् मशाल : १९८५ ला शिवसेनेचा एकमेव आमदार मशाल चिन्हावरच निवडून आलेला; आमदाराचं नाव वाचून वाटेल आश्चर्य

त्याचप्रमाणे मुनगंटीवार यांनी बाळासाहेबांच्या एका जुन्या भाषणाचा दाखलाही दिला. “बाळासाहेब म्हणायचे की ज्या दिवशी काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल त्या दिवशी मी शिवसेनेचं दुकान बंद करेन. मला वाटतं उद्धव ठाकरेंनी दुकान बंद करण्याचाच प्रयत्न केला आहे,” असंही मुनगंटीवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar slams uddhav thackeray says felt bad to see him bow in front of sonia gandhi scsg
Show comments