विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ४२ हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडी घेत विजयाची हॅटट्रीक केली.
या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात झालेल्या दुरंगी लढतीत डॉ. तांबे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांच्याविरुद्ध ४२८२५ मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला. डॉ. तांबे यांना ८३३११ मते मिळाली. तर डॉ. पाटील यांना ४०४८६ मते मिळाली.

सोमवारी सकाळी ८ वाजता अंबड येथील सेंट्रल वेअर हाऊस येथे मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्याला दुपारी ३ वाजता सुरुवात झाली. तर सायंकाळी ७ वाजता पहिल्या फेरीत डॉ. तांबेंना १७ हजार ७१७ मते मिळाली. डॉ. प्रशांत पाटील यांना ८ हजार ५० मते मिळाली. तर डाव्या आघाडीचे उमेदवार राजू देसले यांना ३८७ मते मिळाली. एकूण मतांपैकी ३०७३ मते बाद ठरवण्यात आली. तर इतर १५ उमेदवारांना ७८३ मते मिळाली. पहिल्याच फेरीत डॉ. तांबे यांनी डॉ. पाटील यांच्याविरुद्ध ९ हजार मतांची आघाडी घेतली.
पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया क्लिष्ट असल्याने मतमोजणी संथपणे सुरू होती. मतमोजणीच्या चौथ्या टप्प्यात डॉ. तांबे यांना ६५ हजार १८५ व डॉ. पाटील यांना ३१ हजार ७९६ मते प्राप्त झाली. डॉ. तांबे यांनी या टप्प्यामध्ये ३३ हजार ३८९ मतांची निर्णायक आघाडी घेतल्याने निवडणुकीचा कौल स्पष्ट होत गेला.
यावेळी डॉ. तांबे यांचे समर्थक व पक्ष कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी केली होती. त्यांच्या नावाची घोषणा होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

atal tinkering labs in 50000 schools
विश्लेषण : अटल टिंकरिंग लॅबमध्ये नेमके कोणते प्रयोग होतात?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
Relief for teacher recruitment candidates Proposal submitted for TET exam
शिक्षक भरती उमेदवारांना दिलासा… ‘टेट’ परीक्षेसाठी प्रस्ताव सादर…
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती
nta announced some changes to prevent malpractices during NEET UG exam
विश्लेषण : नीट यूजी परीक्षेतील अचानक केलेले बदल गोंधळ वाढवणारे?
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
causes of GBS, GBS, Central high level team ,
‘जीबीएस’च्या नेमक्या कारणांचा शोध! केंद्रीय उच्चस्तरीय पथकाकडून पुण्यात तपासणी सुरु

Story img Loader