गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी मुलगी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची निवड मागील महिन्यात झाल्यानंतर पानगाव येथील खासगी पनगेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांची अविरोध निवड झाली. दोन कारखान्यांच्या अध्यक्षपदी मायलेकीची निवड होण्याची बहुधा ही राज्यातील पहिलीच वेळ.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी १५ वर्षांपूर्वी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. तर खासगी तत्त्वावर पानगाव (ता.रेणापूर) येथे पनगेश्वर साखर कारखान्याची निर्मिती केली. दोन्ही कारखान्यांचा कारभार मुंडेच पाहात. मुंडे यांच्या निधनानंतर वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक मागील महिन्यात झाली. पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्ष आहेत. तर पनगेश्वर कारखान्याचे अध्यक्ष किसनराव भंडारे यांचा कार्यकाल संपल्यानंतर नुकतीच संचालक मंडळाची बठक होऊन त्यात गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा