केंद्र व राज्य सरकारच्या अस्पष्ट धोरणामुळे सहकारी कारखाने व संस्था अडचणीत आल्या आहेत. पाण्यासंबंधी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी हक्काच्या पाण्यासाठी सदैव लढा दिला. याच विचाराने आपल्या सर्वाना पुढे हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. सरकार कोणतेही असूद्यात पाण्या बाबत कोणतीही तडजोड आम्ही करणार नाही असा स्पष्ट इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा ६८ वा बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ प्रवरानगर येथील कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार सभेचे सरचिटणीस अविनाश आपटे होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषद अध्यक्षा ना.सौ.शालिनीताई विखे पाटील, कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे पाटील, उपाध्यक्ष पोपटराव लाटे, डॉ.भास्कर खर्डे, विक्रांत विखे, ज्ञानेश्वर गोंदकर, कैलास तांबे, प्रताप तांबे, बाळासाहेब भवर, गीता थेटे, हिराबाई कातोरे, नंदकिशोर राठी, शांतिनाथ आहेर उपस्थित होते. सहकारी कारखानदारी टिकण्यासाठी सामुहीक प्रयत्नांची गरज आहे. ऊस शेती वाढविण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी कारखाना व कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांचे तर्फे ऊस विकास उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कारखान्याची सर्व माहिती आता ऑनलाईन सुरू होणार असून इंटरनेट अॅपच्या माध्यमातून उस लागवडीची, इतर कामांची तसेच शेतीच्या निगा व काळजी याबाबतची माहिती तातडीने कार्यालयात प्राप्त होणार आहे. सर्व सभासद शेतकरी यांनी येत्या गळीत हंगामासाठी उस क्षेत्राचे मोठे उद्दीष्ठ ठेवणे अपेक्षीत आहे. ऊसाचे एकरी उत्पन्न आता शंभर टनापर्यंत घेणे गरजेचे आहे. त्यासाठी ऊस विकास प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. आता सिमोलंघ्घन करणे गरजेचे आहे. वाईट शक्तीचा नाश करून चांगल्या विचारांबरोबर विकासाच्या नव्य वाटा निर्णाण करावयाच्या आहेत त्यासाठी सर्वानी एकत्रितपणे प्रयत्न करावे लागणार आहे असे विखे पाटील म्हणाले.
कारखान्याचे चेअरमन डॉ.सुजय विखे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ऊसाचे एकरी उत्पादन वाढीसाठी अनेक उपक्रम कारखान्यामार्फत सुरू करण्यात आले आहेत.