सातारा : जिल्ह्यातील कारखान्यांचा चालू ऊस गळीत हंगाम आटोपला असून, जिल्ह्यात नऊ सहकारी व आठ खासगी मिळून १७ कारखान्यांकडून ९४ लाख ३१ हजार २८८ टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. ९.७० टक्के सरासरी उताऱ्यानुसार जिल्ह्यात ९१ लाख ५० हजार २७ क्विंटलइतके साखरेचे उत्पादन हाती आले असल्याची माहिती पुणे साखर आयुक्तालयाने दिली आहे.

गतवर्षी म्हणजे सन २०२३-२४ या काळातील गळीत हंगाम ६ एप्रिलपर्यंत सुरू होता. त्या हंगामात जिल्ह्यात १०५ लाख २३ हजार ८८१ टन उसाचे गाळप करून १०.४९ टक्के साखर उताऱ्यासह ११० लाख ३४ हजार ५६८ क्विंटल साखर उत्पादित केली होती. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्यात साखर उत्पादनामध्ये १८ लाख ८४ हजार ५४१ क्विंटल इतकी घट झाली आहे.

ऊसगाळपात काही अपवादवगळता सुरुवातीपासूनच प्रथम क्रमांकावर असलेल्या जरंडेश्वर (गुरू कमोडिटी) या खासगी कारखान्याने आघाडी कायम राखली आहे. तर साखर उत्पादनात कृष्णा सहकारी साखर कारखान्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. उताऱ्यात रयत सहकारी साखर कारखाना १२.०८ टक्के उतारा घेत आघाडीवर राहिला आहे.

जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यांनी ४४ लाख ८३ हजार ४५५ टन ऊस गाळप करत ११.५० टक्के सरासरी उताऱ्यानुसार ५१ लाख ५६ हजार ९४२ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे, तर खासगी कारखान्यांनी ४९ लाख ४७ हजार ८३३ टन उसाचे गाळप करत ८.०७ टक्के सरासरी उताऱ्यानुसार ३९ लाख ९३ हजार ८५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.

गतवर्षी निडवा उसाचे संगोपन केलेल्या शेतकऱ्यांच्या निडवा उसासाठी प्रतिटन शंभर रुपये जास्त दर देण्यात आला. तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या नोंदीत क्षेत्रावरील एक ऊसदेखील गाळपाविना राहणार नाही, अशी आदर्शवत कार्यवाही करणाऱ्या अजिंक्यतारा कारखान्याकडून नोंदणी केलेल्या सर्व क्षेत्रावरील उसाचे गाळप वेळेत पूर्ण केले. या पुढील हंगामातदेखील आदर्श कार्यपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. -जिवाजी मोहिते, कार्यकारी संचालक, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना

जिल्ह्यातील साखर उत्पादन आकडेवारी

कारखाना ऊस गाळप (टन)साखर (क्विंटल)साखर उतारा (टक्के)
श्रीराम सहकारी४५१८६७ ५२३३५० ११.५५
कृष्णा सहकारी१२,३९,००८ १४,५२,५५७ ११.६५
किसनवीर सहकारी३९२९०४ ४१९७०० १०.६६
बाळासाहेब देसाई सहकारी२०५००१२४००४० १०.८८
सह्याद्री सहकारी८५३९५९ ९६६८५० ११.२७
अजिंक्यतारा सहकारी५६८००० ६५२५२५ ११.४७
रयत सहकारी४४३९२३ ५३४६७० १२.०८
प्रतापगड सहकारी१९१८०३ २२३४०० ११.७०
खंडाळा सहकारी१३६९९० १४३८५० १०.३४
दत्त इंडिया खासगी६५०५९५ ३४२१०० ५.१४
जरंडेश्वर खासगी१६,७१,३८४ १४,१३,१५० ८.३९
जयवंत शुगर्स खासगी ५५०६४२ ४८२७५० ८.८४
ग्रीन पॉवर खासगी१५६१२५ १७४२५० ११.१८
स्वराज इंडिया खासगी४७५१६१ २४३२४०७.८८
शरयू ॲग्रो खासगी – ५८८०५३ – ४९७५३५ – ८.६५५८८०५३ ४९७५३५ ८.६५
खटाव – माण ॲग्रो खासगी ४५००९० ४०१४००८.९३
शिवनेरी शुगर्स खासगी- ४०५७८३ – ४३८६६०- १०.८८४०५७८३ ४३८६६०१०.८८
एकूण ९४,३१,२८८ ९१,५०,०२७ ९.७०