उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच एकनाथ शिंदे यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली नाही, असा गंभीर आरोप सुहास कांदे यांनी केला होता. कांदे यांच्या आरोपाला माजी कृषिमंत्री दादा भुसे यांनी दुजोरा दिला आहे. ”सुहान कांदेंनी केलेल्या आरोपात तथ्य आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली होती. मात्र, तरीही एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्यात आली नाही, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – नाना पटोले कथित Viral Video प्रकरण: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, “संबंधित पिडिता तक्रार…”

दादा भुसे नेमकं काय म्हणाले?

सुहास कांदेंनी केलेल्या आरोपात तथ्य आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली होती. त्यात बैठकीत मी ही उपस्थित होतो. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्यावेळी पालकमंत्री म्हणून काम करताना एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांच्या संघटनाकडून धमक्या येत होत्या. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना सुरक्षा द्यावी, अशीही चर्चा झाली. मात्र, त्यांना सुरक्षा देण्यात आली नाही, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – CBSE 12th Result 2022 : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

सुहास कांदेंनी काय आरोप केलेत?

“ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, त्यावेळी दोन्ही गृहमंत्र्यांनी (राज्य आणि कॅबिनेट) त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा विचार केला होता. पण उद्धव ठाकरेंनी सकाळी ८.३० वाजता शंभूराज देसाई यांना फोन करुन एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका असं सांगितलं,” असा दावा सुहास कांदे यांनी केला होता. तसेच “एक मराठी माणूस नक्षलवाद्यांविरोधात लढत असताना त्याला जीवे मारण्याची धमकी मिळत असूनही सुरक्षा का पुरवण्यात आली नाही? याउलट जे हिंदुत्वाच्या विरोधात होते त्यांना झे़ड प्लस सुरक्षा का देण्यात आली?”, असा प्रश्नही कांदे यांनी उपस्थित केला होता.

Story img Loader