लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नांदेड : किनवट विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार गोविंद सांबन्ना जेठेवार यांनी मंगळवारी दुपारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. गोविंद जेठेवार हे किनवट तालुक्यातील स्थानिक मन्नेरवारलू समाजातून येणारे उमेदवार आहेत.

आणखी वाचा-Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

जेठेवार यांना तातडीने गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे प्रथमोचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जेठेवार यांना आदिलाबाद येथे पाठविण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती कशी आहे, हे अजून कळाले नसून, विष प्राशन करण्याचे कारणही अजून समोर आलेले नाही. सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार न घेता निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला होता. सर्व प्रकियेनंतर त्यांना ‘ऑटोरिक्षा’ हे मतदानाचे चिन्ह प्राप्त झाले होते.