अंबड तालुक्यातील वडीकाळ्या गावातील संजय भाऊराव ढेबे आणि संगीता संजय ढेबे या अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. खासगी वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे त्यांच्यावर कर्ज होते, असे सांगण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – उदय उमेश लळीत सरन्यायाधीश पदी ; सोलापूरकरांसाठी आनंदाचा दिवस

संजय ढेबे यांना एक एकर शेती होती आणि त्यामुळे उत्पन्नाचा अन्य मारग म्हणून स्वत:च्या ट्रॅक्टरवर ऊसवाहतुकीसाठीही जात अ्सत. त्यांच्या मागे एक मुलगा आणि एक विवाहित मुलगी आहे. गोंदी पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली असून सुखापुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत दाम्पत्याचे शवविच्छेदन करण्यात आले. शनिवारी सकाळी ही माहिती मिळताच मृत संजय ढेबे यांच्या घरासमोर ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide of indebted farmer couple amy