जिवापाड जपलेली पिके गारपिटीने उद्ध्वस्त झालेली.. माथ्यावर कर्जाचा डोंगर.. राज्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले.. त्यामुळे नुकसान भरपाईबाबत निर्माण झालेली अनिश्चितता, या सर्व पार्श्र्वभूमीवर अस्मानी व सुलतानी संकटाच्या कात्रीत सापडलेल्या बळीराजाने मृत्यूला कवटाळण्याचे सत्र राज्यात सुरूच असून मंगळवारी त्यात आणखी सात जणांची भर पडली. गेल्या २४ तासांत मराठवाडय़ात पाच तर उत्तर महाराष्ट्रात दोघांनी आत्महत्या केली.
गारपिटीचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या मराठवाडय़ात मंगळवारी दिवसभरात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील आळणी येथील शेतकरी अनिल कुलकर्णी (५६) यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. शनिवारपासून ते गायब होते. मंगळवारी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यावर खासगी सावकाराचे मोठे कर्ज होते. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील दिगंबर राऊत यांनीही विष पिऊन मृत्यूला कवटाळले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा