राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केल्यानंतर सुजात प्रकाश आंबेडकर चर्चेत आले. डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांच्या चौथ्या पिढीचं प्रतिनिधीत्व सुजात करतात. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सुजात यांची एक ठाम भूमिका आहे. या खास मुलाखतीतून आपण त्यांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका जाणून घेणार आहोत.
अमित ठाकरे यांना सुजात आंबेडकर यांनी चहाचे आमंत्रण दिले आहे. राजगृह या त्यांच्या निवास्थानी चहासोबत आपण चर्चा करू अशी जाहीर विनंती त्यांनी अमित ठाकरे यांना केली आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंगे काढले गेले नाहीत तर मशिदींसामोर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा केली होती. यावर प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी राज यांना आक्रमकतेने उत्तर देत आमित ठाकरे यांनी आधी हनुमान चालीसा बोलून दाखवावी असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे.