आमदार राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदार संघामध्ये गाव भेट यात्रा काढली आहे . मतदार संघातील सर्व गावांमध्ये आमदार राम शिंदे ही यात्रा घेऊन जात मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे.मात्र या यात्रेमध्ये माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची समर्थक कार्यकर्ते मात्र अद्याप कोठेही सहभागी झाल्याची दिसून येत नाही. ते या यात्रेमधून गायब झाले आहेत यामुळे याची जोरदार चर्चा सध्या मतदारसंघांमध्ये सुरू आहे.यामुळे कर्जत जामखेड मतदार संघामध्ये आमदार राम शिंदे यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्याविषयी निकालानंतर विखे समर्थक नाराज असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एवढेच नव्हे तर विरोधी असणारे उमेदवार निलेश लंके यांना उभा करण्यामध्ये राम शिंदेंचा स मोठा हात आहे असे आता उघडपणे विखे समर्थक बोलत आहेत.

अवघ्या काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. कर्जत जामखेड मतदार संघ हा राज्यामध्ये सर्वात लक्षवेधी मतदार संघ आहे. आमदार रोहित पवार यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून व महायुतीकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. रोहित पवार यांना रोखण्यासाठी आमदार राम शिंदे यांनी देखील जोरदार मोहीम उघडले आहे. त्यांनी अनेक पक्षातील पद प्रमुख पदाधिकारी भारतीय जनता पक्षामध्ये घेतले आहे.. तसेच गावोगावी गाव भेट यात्रा आणि विविध विकास कामांचे उद्घाटन याचा धडका उठून गेला आहे.

हेही वाचा >>>Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!

विखे गट अलिप्त

मात्र कर्जत जामखेड मतदार संघामध्ये या गाव भेट यात्रेमध्ये माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना मानणारे त्यांचे कार्यकर्ते मात्र कुठेही दिसून येत नाही. यामध्ये कर्जत तालुक्यातील युवक नेते दादासाहेब सोनमाळी,  यांच्यासह कर्जत जामखेड मतदार संघातील  अनेकांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार राम शिंदे यांच्या विरोधात विखे समर्थक यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये नाराजी असल्याचं दिसून येत होतं. याचे प्रमुख कारण म्हणजे उमेदवारी विखेंना देऊ नये यासाठी राम शिंदे यांनी केलेला मोठा निलेश लंके यांना घेऊन लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळावी यासाठी राम शिंदे यांनी केलेले आणि यामुळे निर्माण झालेली विकास समर्थकांमधील आता ही नाराजी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचे दिसून येत आहे. आमदार राम शिंदे यांच्या गाव भेट यात्रेपासून सर्व विखे समर्थकांनी स्वतःला दूर ठेवले आहे. आणि ही नाराजी पुढील काळामध्ये जर वाढत गेली तर याचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार राम शिंदे यांना नक्कीच फटका बसू शकतो.

हेही वाचा >>>Pankaja Munde : “हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा पक्ष सोडायला नको होता, पण…”; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

विखे गटाच्या स्वतंत्र बैठका

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे गटाच्या मतदारसंघांमध्ये काही स्वतंत्र गुप्त बैठका सुरू असल्याची देखील माहिती एका पदाधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले आहे. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीत जाणीवपूर्वक आमदार राम शिंदे यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांना त्रास दिला व त्यांच्या विरोधात काम केले अशा पद्धतीची वक्तव्य कार्यकर्त्यांनी उघडपणे बैठकीमध्ये बोलताना मांडले आहेत. यामुळे पुढील काळात विखे गट सक्रिय होणार का नाही ती कोणती भूमिका घेणार याविषयी मतदारसंघात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Story img Loader