अलिबाग सायकलपटू सुमित सुदर्शन पाटील २०१४मध्ये होणाऱ्या ‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’ स्पध्रेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. जगातील सर्वात खडतर अशा या स्पध्रेत सहभागी होणारा तो तिसरा भारतीय सायकलपटू ठरणार आहे. ‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’ ही जगातील अतिशय खडतर सायकल स्पर्धा असून, ही स्पर्धा पूर्ण करणे म्हणजे माऊंट एव्हरेस्ट सर करण्यापेक्षा कठीण असल्याचे बोलले जाते. पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतामधून निवड होणारा तिसरा सायकलपटू ठरला आहे. त्यामुळे सुमितवर अभिनंदनाचा वर्षांव होतो आहे.  लहानपणापासूनच सायकलिंगची आवड असणाऱ्या सुमितने स्पध्रेसाठी खूप मेहनत घेतली आहे. बंगलोर-उटी-म्हैसूर हे ६०१ किलोमीटरचे अंतर ३० तास ५२ मिनिटांत पार केल आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तीस तासांत केवळ २० मिनिटेच सुमितने झेप घेतली आहे. त्यामुळे सुमितची रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका या खडतर सायकल स्पध्रेसाठी निवड झाली आहे. आता ५००० किलोमीटरचे अंतर १२ दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट त्याच्यासमोर असणार आहे. पुढील वर्षांच्या जून महिन्यात तो या स्पध्रेत सहभागी होणार आहे. आठवीपासून सायकिलगचा छंद जोपासणाऱ्या सुमितने यापूर्वी पॅरिसमधील सायकिलग स्पर्धेतही आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. या स्पध्रेत त्याने १२०० किमीचे अंतर २१ दिवसांत पूर्ण केले आहे, तर युथ हॉस्टेल संस्थेमार्फत आयोजित गुवाहाटी ते तायवांग या ६९० किमीची एक्सपेडिशन त्याने अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.    मूळचा अलिबागचा असलेला सुमित सध्या वास्तव्याला मुंबईत आहे. त्यामुळे आठवडय़ातून दोन वेळा घरी येताना तो हे अंतर सायकिलग करतच पूर्ण करत असतो. याशिवाय अधूनमधून मुंबई ते पुणे, अलिबाग ते पुणे हे अंतरही तो सायकिलग करत पूर्ण करतो. बंगलोर-उटी-म्हैसूर हे अंतर पूर्ण करण्यापूर्वी त्याने मुंबई ते महाबळेश्वर दरम्यान सायकिलग केली आहे. सायकिलग आणि सन्य दलात नोकरी या दोन गोष्टीचे त्याला विलक्षण वेड आहे. दोन्ही क्षेत्रांत देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द त्याने उराशी बाळगली आहे. आजच्या युवा पिढीबाबत वारंवार निष्क्रियतेचे आक्षेप नोंदविले जात असताना सुमितने याच युवा वर्गाला नवा आदर्श दाखवून दिला आहे.  
आंतरराष्ट्रीय स्पध्रेसाठी अलिबागचा युवक पात्र ठरल्याने तमाम अलिबागकरांना व रायगडवासीयांना त्याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी अलिबाग येथे सुमितच्या सत्काराप्रसंगी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा