महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने खास मे महिन्याच्या उन्हाळी सुटीत ज्येष्ठ नागरिक व कुटुंबीयांसह विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य मुर्ढेश्वर, गोकर्ण, अष्टविनायक तसेच संपूर्ण उत्तर भारत दर्शनाच्या सहली आयोजिल्या आहेत.
तीन दिवसांची खास अष्टविनायक दर्शन सहल १७ मे रोजी सकाळी सहा वाजता निघणार असून यात केतकावळे बालाजीसह एकमुखी दत्तात्रेयाचे मंदिर, देहू, भीमाशंकर, उनेरे (गरम पाण्याचे कुंड) या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेता येईल. तर २० मे रोजी रात्री ८ वाजता नैसर्गिक सौंदर्याने समृध्द समुद्र किनाऱ्यासह कोकण व अन्य धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी सहल निघणार आहे. यात गणपतीपुळे, मारलेश्वर, पावस, धर्मस्थळ, शंृगेरी, उडपी, मुर्ढेश्वर, गोकर्ण, बदामी तथा कुडल संगम यांचा समावेश आहे.
याशिवाय २२ दिवसांची संपूर्ण उत्तर भारत दर्शन सहल निघणार असून यात परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, शेगाव, ओंकारेश्वर, इंदूर, उज्जन, चित्रकुट, काशी, हरिद्वार, ॠषिकेश, अमृतसर, वाघा बॉर्डर, कटरा, वैष्णवीदेवी, दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावन, अजमेर, पुष्कर, जयपूर, माऊंट अबू, सोरटी सोमनाथ, द्वारका, नागेश्वर, सुरत, त्र्यंबकेश्वरमार्गे परत सोलापूर ही धार्मिक व पर्यटनस्थळे पाहता येतील. या सहलींमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी एस. टी. महामंडळातील प्रभाकर माशाळे (मोबाइल ९८५०८८२१२०) किंवा ताराचंद राठोड (९९६०७३६७३२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सोलापूर आगार वरिष्ठ व्यवस्थापकांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा