राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही वेळापूर्वीच पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळळी त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तरं दिली. मी दौरे आत्ता करत नाही तर पाचही वर्षे माझे दौरे सुरु असतात. काही लोक वेगळ्या विचारांमध्ये काम करत आहेत. मी छत्रपती शाहू आणि फुले, आंबेडकरांचा विचार सोडलेला नाही, सोडणार नाही. मी फायदा आणि नुकसान पाहण्यासाठी राजकारणात आलेले नाही, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सुनील शेळकेंवरही टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार लढाऊ वृत्तीचे आहेत

शरद पवार युवकांशी, तरुणांशी संवाद साधत आहेत. युवा पिढीतून नवं नेतृत्व उदयास येऊ शकतं. येत्या काळात काय होतं आहे ते आपण पाहू. २०१९ ला सिंगल डिजिट सीट येतील सांगितलं गेलं होतं. पण जे आमदार आले ते शरद पवारांच्या लढ्यामुळे आले. मी थोडासा वेगळा विचार करते, प्रत्येकाची मक्तेदारी नसते की आपणच सत्तेत असली पाहिजे. पण विरोधकही हवा. पक्ष फोडायचा, घरं फोडायची यातून काय निष्पन्न होणार? या सगळ्यांत सामान्य माणूस भरडला जातो असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

महायुतीबाबत मी काय बोलणार?

महायुतीत कसं जागावाटप कसं होतंय अजित पवारांच्या गटाला किती जागा मिळणार मला काहीच माहीत नाही. पण रामदास कदम म्हणाले तसं घडूही शकतं. कारण अनेकदा या गोष्टी घडल्या आहेत. राजकारण करताना राजकारणच केलं पाहिजे. त्यात व्यक्तिगत वैर नसतं. माझे कुणाबद्दलही मनभेद नाहीत. भाजपाशीही माझे राजकीय मतभेद आहेत. पण मनभेद कुणाशाही नाहीत. मी माझ्याबद्दल सांगते आहे की माझे कुणाशीही मनभेद नाहीत. राजकीय मतभेद आहेत का? आहेत. वैचारिक मतभेद आहेत का हो आहेत. राहुल कुल आणि कांचन कुल यांच्या विरोधात मी लढले. पण मी त्यांचं कौतुक करते. कारण त्यांनी कधीही माझ्यावर वैयक्तिक टीका केली नाही तसंच मी पण त्यांच्या विरोधात वैयक्तिक टीका केली नाही. आमचा फारसा काही संवाद नव्हता. पण मी त्या दोघांचंही कौतुक करते. की या दोघांनीही माझ्या विरोधात वैयक्तिक पातळीवर उतरले नाहीत. त्यांनी महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जपला.

हे पण वाचा- “शरद पवार जर आमदारांना धमक्या देणार असतील तर..”, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

सुनील शेळकेंना टोला

जयंत पाटील यांनी पक्ष सोडला तर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार त्याला जबाबदार असतील असं सुनील शेळके म्हणाले. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जाऊ द्या.. सुनील शेळके आता धमक्या देण्यात इतके व्यस्त आहेत की हेपण त्यांना कळतं आहे. एमआयडीसीतल्या लोकांना जरा त्रास त्यांनी कमी दिला तरी तिथे गुंतवणूक करणाऱ्यांना थोडा दिलासा मिळेल असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil shelke is busy and giving threats he should stop harassing people in midc says supriya sule scj
Show comments