अलिबाग- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात त्यांनी आपल्याकडे १४ कोटी ५७ लाख ५७ हजारांची मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या तटकरे आणि त्यांच्या पत्नीकडे २०१९ मध्ये १२ कोटी ६४ लाख ८५ हजारांची एकूण मालमत्ता होती. यात पाच वर्षात १ कोटी ९२ लाख ८२ हजारांची वाढ होऊन ती २०२४ मध्ये १४ कोटी ५७ लाख ८२ हजार झाली आहे.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today: वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी; पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी अपडेट

सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथ पत्रात स्वतःकडे ४ कोटी १७ लाख १४ हजार जंगम मालमत्ता तर पत्नी वरदा सुनील तटकरे यांच्याकडे १ कोटी २२ लाख ५७ हजार रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. तर स्वतःकडे ४ कोटी ४५ लाख ७९ हजार रुपयांची, तर पत्नीकडे ४ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच तटकरे यांच्या तुलनेत त्यांच्या पत्नी वरदा यांच्याकडे जास्त स्थावर मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. महत्वाची बाब म्हणजे सुनील तटकरे यांच्या तुलनेत वरदा तटकरे यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षात जास्त वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. तटकरे यांनी त्यांच्यावर १ लाख १४ हजार ५२० रुपयांचे दायित्व असल्याचेही नमूद केले आहे.

हेही वाचा – उदयनराजे यांच्या संपत्तीत चक्क २१ कोटी रुपयांची घट

वडिलांपेक्षा मुलगा श्रीमंत…

दरम्यान सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांनीही आपला डमी उमेदवारी अर्ज काल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला. या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात त्याने एकूण ३८ कोटी ०५ लाख ४२ हजार रुपयांची मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. यात स्वतःकडे १७ कोटी २९ लाख ६३ हजार तर पत्नी वेदांती तटकरे यांच्याकडे ६ कोटी ३१ लाख ३४ हजार जंगम मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. तर स्वतःकडे ११ कोटी ७६ लाख ५९ हजार तर पत्नीकडे २ कोटी ६७ लाख ८६ हजार स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare has property worth rs 14 crore 57 lakh ssb
Show comments