Mahendra Thorve on Sunil Tatkare : रायगड जिल्ह्यातील महायुतीत जागावाटपावरून वाद झाला. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना (एकनाथ शिंदे) कडे गेला आहे. या मतदारसंघातून महेंद्र थोरवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, त्यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचं आव्हान असणार आहे. कारण, सुधाकर घारे अपक्ष लढणार असले तरीही त्यांना सुनील तटकरेंचं मोठं पाठबळ असल्याचा दावा महेंद्र थोरवे यांनी केला आहे. यानिमित्ताने सुनील तटकरे यांनी महायुतीचा धर्म मोडला असल्याचा दावाही त्यांनी केला. आज पत्रकार परिषद घेऊन महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

महेंद्र थोरवे म्हणाले, “राष्ट्रवादीचे उमेदवार सुधाकर घारे यांना सुनील तटकरेंचं अभय आहे. सुनील तटकरेंच्या आशीर्वादामुळेच ते अपक्ष उमेदवार म्हणून या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. महायुतीत असतानाही सुनील तटकरे यांनी जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे. त्यामुळे मी हे इतरांच्या निदर्शनास आणून देत आहे. महायुतीचं सरकार आणण्याकरता तिन्ही पक्षाचे नेते प्रयत्न करत आहेत, त्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचं काम सुनील तटकरे करत आहेत.”

maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Raj Thackeray Said About Sharad Pawar
Raj Thackeray : “आमच्याकडे शरद पवार नावाचे संत जन्माला आले त्यांनी जातीपातींमध्ये..”, राज ठाकरेंची बोचरी टीका
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा >> Hemant Godse : महायुतीत धुसफूस? शिंदे गटाच्या नेत्याचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप; म्हणाले, ‘पाठीत खंजीर खुपसला’

सुधाकर घारे हे सुनील तटकरेंचं पाप

m

“ज्यादिवशी महायुतीने सुनील तटकरेंना लोकसभेसाठी रायगडची उमेदवारी घोषित केली, तेव्हापासून आम्ही तटकरेंसाठी एकत्रपणे काम करायला सुरुवात केली. त्यांना विजय सुद्धा मिळवून दिला. यामध्ये सर्वच आमदारांचे योगदान आहे. महायुतीचा धर्म शिवसेना, भाजपा आणि आरपीआयने पाळला आहे. परंतु, सुनील तटकरे पाळत नाहीत. सुधाकर घारे हे सुनील तटकरेंचं पाप आहे”, अशी टीकाही महेंद्र थोरवे यांनी केली.

सुनील तटकरे आता माझा घात करण्याचा प्रयत्न करत आहेत

“महायुतीमध्ये छेद पाडण्याचं काम सुनील तटकरे करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी महायुतीत यावी हे आम्हाला मान्य नव्हतं. शिवेसना, भाजपा, आरपीआय ही अभेद्य महायुती आहे. ही सक्षमपणे राज्यात उभी आहे”, असंही ते म्हणाले. “रायगड जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर सुनील तटकरे ज्यांच्याशी गोड बोलले आहे त्या प्रत्येकाचा काटा त्यांनी काढला आहे. अंतुले यांना सुनील तटकरेंनी राजकीयदृष्ट्या संपवलं. शेकापच्या जयंत पाटलांना संपवण्याचं काम सुनील तटकरेंनी केलं. आता ते माझा घात करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी सुनील तटकरेंना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. माझ्याबरोबर प्रत्येकजण उभा आहे”, असंही ते म्हणाले.

सुनील तटकरे महायुतीला लागलेला कॅन्सर

“सुधाकर घारेंची यात काही चूक नाही. सुनील तटकरेंनीच त्यांना कंबरेपर्यंत उभं केलं आणि आता त्यांचाच कडेलोट करण्याचं काम सुनील तटकरे करत आहेत. महायुतीत असूनसुद्ध सुनील तटकरे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा प्रचार करण्यास सर्वांना सांगत आहेत. त्यामुळे सुनील तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर आहेत”, अशी टीकाही त्यांनी केली.

Story img Loader