लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे पुन्हा एकदा विजयी झाले. शिवसेना उबाठा गटाच्या अनंत गीते यांचा त्यांनी ८२ हजार ७८४ मतांनी पराभव केला. सुनील तटकरे यांना ५ लाख ८ हजार ३५२ मतं मिळाली. तर अनंत गीते यांना ४ लाख २५ हजार ६६८ मते मिळाली. तब्बल २७ हजार २७० जणांनी नोटा चे बटन दाबले. वंचित आघाडीच्या कुमुदिनी चव्हाण मतदारांवर प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरल्या. त्यांना १९ हजार ६१८ मते मिळाली. अन्य उमेदवार सपशेल अपयशी ठरले.

Nana Patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Direct tax rises 16 prcent to Rs 16.9 lakh crore in FY25
वैयक्तिक प्राप्तिकरातील वाढ अर्थव्यवस्थेसाठी वरदान; प्रत्यक्ष कर संकलन १२ जानेवारीपर्यंत १६.९० लाख कोटींवर
nashik case filed against three individuals for causing accident by transporting iron bars
नाशिक अपघातास कारणीभूत तिघांविरुध्द गुन्हा, सळई पुरवठादाराचाही समावेश
MVA rift grows as Shiv Sena ubt announces independent poll strategy
महाविकास आघाडीत धुसफुस; शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही स्वतंत्र लढण्याची तयारी
purchase of educational systems will be done through tendering Municipal Corporations Education Department clarified
टीका होताच महापालिका नरमली, निविदा काढूनच होणार शैक्षणिक प्रणालीची खरेदी!
Shiv Sena Thackeray group Nashik municipal elections
नाशिक महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार
maharashtra FASTag mandatory all vehicles
विश्लेषण : राज्यात १ एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक… नेमके काय होणार?

अलिबाग, पेण, महाड आणि श्रीवर्धन या चार विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांना मताधिक्य मिळाले. तर दापोली आणि गुहागर या रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मतदारसंघात अनंत गिते आघाडीवर राहीले. अलिबाग आणि पेण या दोन मतदारसंघात मिळालेल्या लक्षणीय मताधक्यामुळे तटकरे यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. या मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान झाले होते. यात १० लाख ९ हजार ५६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापैकी ५०.१७ टक्के मते सुनील तटकरे यांना मिळाली. तर अनंत गीते यांच्या पारड्यात ४३ टक्के मतं पडली.

आणखी वाचा-दोन पराभवांची राणेंकडून परतफेड; तळकोकणात महायुतीला चांगेलच यश

या मतदारसंघात १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु खरी लढत सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात होती. ही लढत चुरशीची होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु तसे झाले नाही. सुनील तटकरे यांनी सहज विजय मिळवला. तोही २०१९ च्या निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. २०१९मध्ये तटकरे यांनी अनंत गीते यांचा ३१ हजार ४३८ मतांनी पराभव केला होता. यावेळी ८२ हजार ७८४ मतंनी विजय मिळवला.

अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात मतमोजणी मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून सुनील तटकरे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी पुढे सुरू राहीली. त्यामुळे विजयाचा मार्ग सोपा होत गेला.

मतदारसंघात नोटा तीसर्‍या क्रमांवार

या मतदारसंघात सुनील तटकरे व अनंत गीते यांच्यासह १३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. वंचीत बहुजन आघाडीच्या कुमुदिनी चव्हाण निवणूक लढवत होत्या. त्यांच्यापेक्षा नोटाला जास्त मत मिळाली. २७ हजार २७० जणांनी नकाराधिकार वापरला. ११ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

आणखी वाचा-धाराशिव : ओमराजे निंबाळकर विक्रमी तीन लाख मतांनी विजयी, महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य असल्याचा दावा

नामसाधर्म्याची खेळी फेल

रायगड लोकसभा मतदारसंघात नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे केले जातात. यावेळी ही खेळी फारशी प्रभावी ठरली नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या व्यतीरिक्त अन्य दोन अनंत गीते अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अपक्ष उमेदवार अनंत बाळूजी गीते यांना जेमतेम ३ हजार ५१५ तर अनंत पद्मा गीते यांना २ हजार ०४० मते मिळाली. त्यामुळे दोघांच्या मतांचा निकालावर कोणताही परिणाम झाला नाही.

मुस्लीम मतांच्या ध्रुविकरणाचा प्रयत्न अयशस्वी

रायगड लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी होती. या मतांचे ध्रुवीकरण करण्यात महाविकास आघाडीने जोरदार प्रयत्न केले होते. खास करून अलिबाग, श्रीवर्धन, महाड आणि दापोली मतदारसंघात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करून सुनील तटकरे यांना पराभूत करण्याची रणनिती महाविकास आघाडीने आखली होती. मात्र अलिबाग आणि श्रीवर्धन मतदारसंघात मुस्लिम मते मिळवण्यात तटकरे यशस्वी झाले.

मतदारसंघसुनील तटकरेअनंत गीतेमताधिक्य
पेण १,१२,९९५६६,०५९ ४६,९३६ (तटकरे)
अलिबाग १,१२,६५४ ७३,६५८ ३८,९९६ (तटकरे)
महाड ७७,८७७ ७४,६२६३,२५१ (तटकरे)
श्रीवर्धन ८६,९०२ ५७,०३० २९,८७२ (तटकरे)
दापोली ६९,०७१ ७७,५०३ ८,४३२ (गीते)
गुहागर ४७,०३०७४,६२६२७,५९६ (गीते)

Story img Loader