उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिंदे गटाच्या आमदरांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. यावरून राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनते अंबादास दानवे यांनी यावरून शिंदे गटाला टोला लगावलेला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Bharat Jodo Yatra : सोनिया गांधींच्या उपस्थितीत शेगावात काँग्रेसची ऐतिहासिक सभा होणार – नाना पटोले

सुनील तटकरे म्हणाले, “हे सुद्धा एक राजकीय गंमतीशीर उदाहरण आहे. एक राजकीय पक्षाला किंवा राजकीय पक्षाच्या आमदरांना दुसऱ्या राजकीय पक्षाचे नेते मार्गदर्शन करणार आहेत. कदाचित या मार्गदर्शनाची गरज एवढ्यासाठीच भासली असेल, गेल्या १०० दिवसांमध्ये जी काही वेगवेगळी वक्तव्यं झाली, घृणास्पद झाली, संस्कृतीची पातळी सोडून ज्या पद्धतीने झाली. कदाचित या सगळ्या गोष्टींचा उबग देवेंद्र फडणवीसांना आला असेल, म्हणून ते मार्गदर्शन करणार असतील.” ते टीव्ही 9 शी बोलत होते.

हेही वाचा – “हिंदुत्वाचं बाळकडू मिळालेलं असताना भाजपाच्या नेत्यांकडून ‘हे’ जर हिंदुत्वाचे धडे घेत असतील, तर …” ; अंबादास दानवेंचा शिंदे गटाला टोला!

याशिवाय विधानपरिषदेचे विरोधी पक्षनते अंबादास दानवे यांनीही शिंदे गटाला यावरून टोला लगावला आहे. “मला असं वाटतं वीर सावरकर असो किंवा शिवसेनाप्रमुख असो यांचं हिंदुत्व भाजपा जे शिवसेनेतून ४० गद्दार फुटले त्यांना सांगत असेल, तर मला वाटतं हेच हास्यास्पद आहे. तुम्ही ४० जण शिवसेनेत होता, शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिशा देणारं आहे. या देशात हिंदू म्हणून सन्मानाने जगायला, हिंदू म्हणून मतदान करायला जर कोणी शिकवलं असेल तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं. एवढं हिंदुत्वाचं आपल्याला बाळकडू मिळालेलं असताना, भाजपाच्या नेत्यांकडून हे जर हिंदुत्वाचे धडे घेत असतील तर मला वाटतं यापेक्षा मोठं दुर्दैवं कोणतही नाही.” असं दानवेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare reacted that devendra fadnavis will guide shinde group mlas msr