अजित पवार यांचं वय लहान आहे. त्यांना पुढील काळात मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते, असं वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं होतं. यावरून अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी दीपक केसरकरांना सुनावलं आहे. अजित पवारांच्या वयावर बोलण्यापेक्षा लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जागा कशा जिंकता येतील, याकडे लक्ष द्यावे, असं प्रत्युत्तर तटकरेंनी केसरकरांना दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीपक केसरकर काय म्हणाले होते?

‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत’, अशी इच्छा मातोश्री आशा पवार यांनी व्यक्त केली होती. त्यावर बोलताना दीपक केसरकरांनी म्हटलं, “मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा आणि आकांशा असण्यामध्ये काही चुकीचं नाही. पण, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जाणार आहेत. अजित पवारांचं वय लहान आहे. त्यांना पुढील काळात मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते.”

हेही वाचा : “भूपेश बघेल भाजपात गेले, तर ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपचे…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

“जनतेचं पाठबळ महत्वाचं”

यावर भंडाऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे म्हणाले, “वयावर नाहीतर कर्तृत्वावर पदे मिळतात. तुमची प्रतिमा, जनतेचं पाठबळही महत्वाचं आहे. लोकसभेची निवडणूक जिंकणे हे राजकीय आव्हान आहे. त्यामुळे अजित पवारांच्या वयावर बोलण्यापेक्षा लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जागा कशा जिंकता येतील, याकडे लक्ष द्यावे.”

हेही वाचा : “घरी बसणाऱ्यांना जनतेनं घरी बसवलं”, मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देत म्हणाले…

“जागा वाटपाबाबत चर्चा करू”

“लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता आहे. पण, जागा वाटपासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही. लोकसभेला ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा निश्चय महायुतीतील तिनही पक्षांनी केला आहे. लवकरच जागा वाटपाबाबत चर्चा करू,” असं सुनील तटकरेंनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare reply deepakar kesarkar over ajit pawar age cm post ssa