सातारा – कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक म्हणून समीर शेख ओळखले जातात. आपल्या कामकाजाच्या धकाधकीतून ग्रामीण भागाचा ग्रामीणपणा, गावातील नागरिकांचे दैनंदिन जीवन, निसर्गाच्या सानिध्यातील त्यांची रोजची दिनचर्या याचा अनुभव घेण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कास पठारावरील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या जुंगटी (ता. सातारा) गावास भेट दिली. येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. गावकऱ्यांबरोबरील सहवास, गप्पा, गावातच केलेल्या मुक्कामातून समीर शेख यांना जुंगटी गाव भावले. तर गावकऱ्यांनाही त्यांच्यातील अधिकारी भावला.

जुंगटी (ता. सातारा) हे कास परिसरातील एक दुर्गम गाव. कास, जुंगटी, बामणोली, मुनावळे परिसरासह संपूर्ण कोयना काठ सह्याद्रीच्या डोंगररांगा निसर्ग सौंदर्याने नटलेल्या असल्याने या भागात भटके, निसर्ग अभ्यासक नेहमीच येत असतात. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनीही निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जुंगटी गावाला गुरुवारी अचानकपणे भेट दिली. गाव भेट, गावकरी, मुलांसोबत संवाद आणि परिसरातील निसर्गात मनमुराद भटकंती असा त्यांचा कार्यक्रम होता.

badlapur sexual assault case
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर पुन्हा हादरलं! मैत्रिणीने मद्य पाजले, मग रिक्षाचालकाने केला तरूणीवर लैंगिक अत्याचार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shashikant Shinde statement regarding Abhaysinhraje Bhosale satara news
पवारांकडून अभयसिंहराजेंवर अन्याय नाही- शशिकांत शिंदे
Anjali Damania on Santosh Deshmukh Murder Case
Anjali Damania: “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कधीच सापडणार नाहीत, कारण त्यांचा…”, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा >>>डॉ. मनमोहन सिंग यांचा सुवर्णकाळ : पृथ्वीराज चव्हाण

गाजावाजा नाही

जिल्ह्यातील सर्वांत मोठे पोलीस अधिकारी आपल्या गावात कोणताही लवाजमा न घेता आपल्या गावात आल्याचे पाहून गावकरी आवाक झाले. त्यांची शाळेच्या दारात गाडी थांबताच त्यांनी शाळेला भेट देऊन, येथील प्राथमिक शाळेत किलबिलणारे उद्याचे विश्व असलेल्या विद्यार्थ्यांशी मनमुराद गप्पा गोष्टी केल्या. शिक्षक राजीव कदम यांच्याकडून शाळेतील पटसंख्या कमी का व अन्य गोष्टींची माहिती करून घेतली. रोजगाराअभावी गावातील कुटुंब शहरात स्थलांतरित झाली असल्याने पटसंख्या कमी असल्याची माहिती देत अन्य विषयी माहिती दिली. नंतर शेख हे एका दुर्गम छोट्याशा गावात शांतमय वातावरणात राहण्यासाठी चालत गेले. तर दुसऱ्या दिवशी ट्रेकिंग करत परत आले. नंतर वाहनाने साताराकडे रवाना झाले.

Story img Loader