Superstition in politics : भारतीय राजकारणात अंधश्रद्धेला कसलेही स्थान नाही. मात्र राजकीय वर्तुळात विश्वास ठेवल्या जाणाऱ्या बऱ्याच धारणा आणि समजुती प्रचलित आहेत. जसेकी बऱ्याच काळापर्यंत असा समज होता की ज्याच्या नावात ‘आर’ हे अक्षर नसलेला नेता कधीही भारताचा पंतप्रधान होऊ शकत नाही. ही पण हा समज २००४ साली मनमोहन सिंग पंतप्रधान बनल्यानंतर संपुष्टात आला. अशाच प्रकारे २०१७ पर्यंत अशी समजूत होती की जो उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री नोएडा या ठिकाणाला भेट देतो तो त्याचे पद गमावतो. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही समजूतही खोटी सिद्ध करून दाखवली. नोएडा या ठिकाणाला भेट दिल्यानंतरही ते पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्रातही कोणताही मुख्यमंत्री पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही, अशा एका धारणेची चर्चा होत असे. पण २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी यशस्वीरित्या २०१९ पर्यंतचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण केला. पण याबरोबर महाराष्ट्रातील एक समजूत मात्र अद्याप कायम आहे, ज्याला आव्हान दिले जाणे अद्याप बाकी आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातील मंत्रालयातील खोली क्रमांक ६०२ संबंधीत समज.

मंत्रालयातील या खोलीबद्दल देखील वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. राज्य सचिवालयातील सर्वात प्रशस्त दालनांपैकी एक असलेली ही खोली घ्यायला मंत्री मागेपुढे पाहातात. ही खोली भूतकाळातील काही धारणांमुळे बदनाम झाली असून ती स्वीकारणाऱ्या व्यक्तीला राजकीय जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो आणि पदाचा राजीनामा द्यावा लागतो असे बोलले जाते. मागील अडीच दशकांपासून ज्या-ज्या मंत्र्यांना ही खोली मिलाली, त्या सर्वांना कुठल्यातरी वाईट गोष्टीचा सामना करावा लागला अशी समजूत आहे. मनीकंट्रोलने यांसंबधीचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा>> १८ महिन्यात ११ हत्या… लिफ्ट देऊन जीव घेणाऱ्या ‘सिरीयल किलर’ला अटक; चौकशीत धक्कादायक म…

पण नेमकं कारण काय?

१९९९ मध्ये ही ६०२ क्रमांकाची खोली तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आली होती. तर २००३ मध्ये ते तेलगी घोटाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोट्यवधी रूपयांच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यात अडकले. त्यांच्यानंतर आलेल्या अजित पवार यांना देखील सिंचन घोटाळ्यात नाव आल्यानंतर राजीनामा द्यावा लागला. २०१४ मध्ये जेव्हा भाजपाचे सरकार आले तेव्हा ही खोली देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमधील मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांना देण्यात आली होती. पुढे खडसे यांना देखील जमीन घोटाळ्यात नाव आल्यानंतर राजीनामा द्यावा लागला. खडसे यांच्यानंतर ही खोली पांडुरंग फुंडकर या भाजपाच्या दुसर्‍या मंत्र्‍यांना देण्यात आली, ज्यांचा २०१८ अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर ही खोली भाजपा नेते अनिल बोंडे यांना देण्यात आली, जे २०१९ मध्ये निवडणुकीत पराभूत झाले.

सध्याच्या सरकारमध्ये ही खोली भाजपाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या सामाजिक कार्य विभागाला देण्यात आली आहे. मात्र या ६०२ क्रमांकाच्या खोलीचा मागचा इतिहास पाहाता त्यांच्या समर्थकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या ही खोली पीडब्लूडी अधिकार्‍यांकडून वापरली जात आहे. तर शिवेंद्रराजे हे त्याच्या बाजूची खोली वापरत आहेत.