पुरवठा विभागाच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जुन्या धान्य गोडाऊनची दुरुस्ती, नव्या मागण्या, जनतेच्या मागण्या, पुरवठा विभागातील मागण्या, अन्न औषध प्रशासनातील रिक्त पद भरती, जिल्हा ग्राहक मंचाच्या इमारतीसाठीचा निधी, धान्य दुकानदारांच्या ग्राहय़ मागण्या व समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून प्रत्येक विभागाने सामूहिक जबाबदारीने काम करण्यासाठी तत्पर राहावे व जनतेला दर्जेदार सेवा दय़ावी असे आदेश अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे अन्न औषध प्रशासन, पुरवठा विभाग, रेशन दुकानदार यांची बठक आयोजित करण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासन विभाग, पुरवठा विभागाच्या कामाचा आढावा घेताना ना. गिरीश बापट बोलत होते. या वेळी पालकमंत्री तथा वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री ना. दीपक केसरकर, जिल्हाधिकारी ई.रवींद्रन, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, माजी आमदार राजन तेली, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, जिल्हा पुरवठा अधिकारी धनाजी तोरस्कर, प्रांताधिकारी कणकवली संतोष भिसे, प्रांताधिकारी सावंतवाडी विठठल इनामदार, प्रांताधिकारी कुडाळ रवींद्र बोंबले यासह सर्व तहसीलदार, रेशन दुकानदार या बठकीला उपस्थित होते. गिरीश बापट म्हणाले, पुरवठा विभाग हा सर्वसामान्य जनतेशी निगडित आहे. अधिकारी व जनता तसेच लोकप्रतिनिधी यांच्या संवादातूनच कोणतही काम चांगल होऊ शकते. पुरवठा विभागाने आपल्या कामात पारदर्शकता आणावी. रेशन धान्य दुकानदारांना विहित वेळेत धान्य उचल करण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. रेशन धान्य दुकानाबाबत जनतेचा विश्वास वाढावा यासाठी कामामध्ये पारदर्शकता आणा. जनतेला वेठीला धरण्याचे कोणतेही प्रकार होऊ नयेत याची खबरदारी घेण्यात यावी. प्रत्येकाने आपली सामूहिक जबाबदारी ओळखून काम करावे. जिल्हय़ात आधार कार्ड िलक करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, विशेष तरतूद करून कंत्राटी कामगार नियुक्त करून आधारकार्ड धारकांचे ल्िंाकेज पूर्ण करून घ्यावे. पुरवठा विभागाने तसेच जिल्हाधिकारी यांनी स्वत: लक्ष घालून विहित वेळेत काम पूर्ण करून घ्यावे. जिल्हय़ात बोगस रेशन कार्डधारक, ज्यांना गॅस मिळाला आहे अशांच्या नोंदीची तपासणी केली जावी. शासनाकडे दिली जाणारी आकडेवारी ही वस्तुनिष्ठ असावी. प्रलंबित प्रस्ताव, नव्याने मागण्यांचे प्रस्ताव पाठवावेत. पुरवठा विभागाचे संपूर्ण संगणकीकरण, अदय़यावत सुविधा, पुरेसा कर्मचारी वर्ग पुरवठा विभागाला देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मतही ना.गिरीश बापट यांनी व्यक्त केले. पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, गणेश चतुर्थीसाठी मिळणारे साखर व तेलाचा पुरवठा वेळेत व्हावा. ग्रामीण भागात रॉकेलची गरज भासते तरी जिल्हासाठी रॉकेलचा कोटा वाढविण्यात यावा, जिल्हय़ातील धान्य गोदामांसाठी पुरेसा कर्मचारीवर्ग नाही त्यामुळे येणाऱ्या अडचणी या वेळी मांडल्या. जिल्हापुरवठा अधिकारी यांनी जिल्हय़ातील पुरवठा विभागाच्या सद्य:स्थितीची सविस्तर माहिती सादर केली. जिल्हय़ात शिधापत्रिका बाबतची प्रवर्गनिहाय माहिती, धान्य दुकाने घाऊक व किरकोळ केरोसिन परवानाधारक, पेट्रोल, डिझेल पंपधारक, गॅस एजन्सीबाबत माहिती, सांविधानिक आदेशांतर्गत देण्यात आलेल्या परवान्यांची माहिती, अन्नपूर्णा योजना नियतन व उचल वाटप, केरोसिन विक्री,गोदाम बांधकाम, धान्य वाहतूक सद्य:स्थिती, दक्षता समितीबाबतची माहिती, तसेच पुरवठा विभागाच्या मागण्यांची सविस्तर माहिती ना. गिरीश बापट यांना दिली.
केरोसीन कोटय़ात वाढ  करावी.  गॅस एजन्सी नसल्यामुळे लोकांची गरसोय होत आहे. एका दुकानापाठीमागे कार्डधारकांची संख्या कमी असल्यामुळे दुकानदारांना कमिशन कमी मिळत आहे. तसेच संपूर्ण ग्रामीणची बिल थकीत असल्याबाबतच्या समस्या धान्य दुकानदारांनी मांडल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा