MP Arvind Sawant on Supreme Court: केंद्रीय निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निकालावर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून न लावता त्यावर दोन आठवड्यांनी सुनावणी घेऊ असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. तोपर्यंत शिंदे गटाने कोणताही व्हिप ठाकरे गटाच्या सदस्यांना बजावू नये, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली असून या निर्णयाचे स्वागत केले आहे. “सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आज निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आम्ही सुनावणी घेत नाही. दोन आठवड्यानंतर यावर सुनावणी घेऊ. आम्हाला समाधान आहे की, आमची मागणी त्यांनी विचारात तरी घेतली. आमची याचिका फेटाळून लावलेली नाही.”, अशा शब्दात अरविंद सावंत यांनी समाधान व्यक्त केले.

हे वाचा >> ‘MPSC चा प्रश्न निवडणूक आयोगाकडे..’, शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादीची टीका; म्हणाले, “यांना खाता, पिता निवडणूक आयोगच..”

evm scam india alliance
ईव्हीएमचा वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! ‘इंडिया’आघाडी याचिका दाखल करण्याची शक्यता
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

“मी एक सामान्य नागरिक म्हणून या घटनेकडे पाहतो तेव्हा साधारण सर्व घटनाक्रम आणि शेड्यूल १० पाहिलं तर लगेच कळून येतं की यात काय निर्णय झाला पाहीजे. संविधानाला टाळून जर निवडणूक आयोग निर्णय घेणार असेल तर देशाच्या लोकशाहीसाठी हे घातक आहे. शेड्यूल्ड १० ची बूज राखली नाही, तर संविधानाची बूज राखली जाणार नाही. आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीतून न्याय मिळाला असं वाटतं”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

हे वाचा >> “एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत राज्यपालांना पूर्ण कल्पना होती, त्यांनी…” कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात गंभीर आरोप

निवडणूक आयोग विकला गेलाय

“निवडणूक आयोगाचे सर्व प्रमुख विकले गेलेले आहेत. ही सेलेबल कमोडिटी झाली आहे. आयोगाने बाजार मांडला आहे. तुम्ही आमच्याबाजूने निकाल द्या, आम्ही तुम्हाला राज्यपाल करतो”, असे सांगितले जात असल्याचा आरोप सावंत यांनी केला. निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीच्या मुळावर आलेला आहे. निवडणूक आयोगाचे सदस्य विकाऊ आणि गुलाम आहेत. त्यांच्या कुठल्याही निर्णयाला ते स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

हे वाचा >> Maharashtra Political Crisis: “विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करणं आमच्यासाठी कठीण”, सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी!

एकनाथ शिंदेंना गटनेता उद्धव ठाकरेंनीच केलं होतं

विधानसभेचे नियमावली काढून बघा. पक्षाचे गटनेते, व्हिप कोण निवडतं? राज्यसभेत मल्लिकार्जून खरगे यांना काँग्रेसचा गटनेता करत असताना सोनिया गांधी यांनी पत्र दिले. मग एकनाथ शिंदे यांच्यासाठी कुणी पत्र दिले होते? आमचेच पत्र घेऊन ते गटनेते झाले. सुनील प्रभू आमचे व्हिप झाले. आजच्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी हे अतिशय प्रभावीपणे सांगितले.

Story img Loader