Supreme Court Hearing on Maharashtra Power Struggle Updates : राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालायच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज ( १४ फेब्रुवारी ) सुनावणी होणार आहे. हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणीसाठी सोपवायचं की नाही, याबाबत यावेळी निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मी ७२ तासांचं सरकार स्थापन केलं होतं, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटत आहे. यासह देश, विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील विविध घडामोडी जाणून घेणार आहेत…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Live News, Political Updates : राजकीय, सामाजिक, मनोरंजन, अर्थकारण, क्रीडा क्षेत्रातील घडामोड एका क्लिकवर
करोनाकाळात कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेने ताब्यात घेतलेल्या गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीसाठी राखीव असलेल्या रांजनोळीमधील एक हजार २४४ घरांची देखभालीअभावी दूरवस्था झाली आहे. कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेने तशाच अवस्थेत ही घरे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) परत केली आहेत. सविस्तर वाचा…
भद्रकालीची निर्मिती असलेले प्राजक्त देशमुख लिखित ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक २२ डिसेंबर २०१७ रोजी मराठी रंगभूमीवर आले. गेल्या पाच वर्षांत या नाटकाला राज्यभरातील प्रेक्षकांकडून उदंड प्रेम मिळते आहे. या नाटकाचे आता अखेरचे काही प्रयोग होणार असल्याची घोषणाही भद्रकालीच्या वतीने करण्यात आली होती. सविस्तर वाचा…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संघ मुख्यालय भेटीचा मुहूर्त अखेर ठरला. शहा १७ फेब्रुवारीला रात्री नागपूरला येणार असून १८ तारखेला संघ मुख्यालयाला भेट देणार आहे. या दौ-यात ते प्रसिद्ध दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत. सविस्तर वाचा…
मॉडेलिंग करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणींना देहव्यापाराच्या दलदलीत ढकलून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलाला गुन्हे शाखेने अटक केली. त्याने एका मोठ्या हॉटेलमध्ये आंबटशौकिन ग्राहकांकडे तरूणीला पाठवत असल्याचे उघडकीस आले.
शत्रूंशी लढणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावीत तसेच शिवरायांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत-पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलानजिक वडगाव उड्डाणपुलाजवळ भरधाव ट्रकने दहा वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. सुदैवाने अपघातात कोणी जखमी झाले नाही. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “आमदारांची अपात्रता आणि अन्य विषयांवर चर्चा झाली. आमदार पक्ष सोडून सुरुत, गुवाहाटील गेले. पक्षाने बोलण्यात आलेल्या बैठकीत गैरहजर राहिले; याचा अर्थ तुम्ही पक्षाची सदस्यता स्वत:च सोडून दिली आहे. तिथेच अपात्रता लागते. तसेच, अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरण आणि महाराष्ट्राचं सत्तासंघर्ष याच्यात काही साम्य नाही. हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावं लागेल,” असं अनिल देसाईंनी म्हटलं.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रश्नपेढीचा वापर करून विद्यार्थी परीक्षेचा सराव करू शकतील.
मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या (एमएमओपीएल) अखत्यारीतील ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिका मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) लवकरच संपादीत करणार आहे. राज्य सरकार याबाबत सकारात्मक असल्याने ‘मेट्रो १’ मार्गिका संपादनाची प्रकिया लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘मेट्रो १’ची संपूर्ण मालकी एमएमआरडीएकडे येणार आहे.
दैनंदिन धकाधकीचे जीवन, अपुरी झोप, कामाचा तणाव, नैराश्य, अपयश यामुळे नागरिकांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे. मानसिक आरोग्य बिघडणाऱ्यांचे समुपदेशन करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या टेली मानस हेल्पलाईनवर मोठ्या संख्येने नागरिक संपर्क साधत आहेत. सविस्तर वाचा…
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व तेथील वाघांची भुरळ जगातिल पर्यटकांना आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सेवानिवृत्त क्रिकेटर मॅथ्यू हेडन याला देखील ताडोबातील वाघाने भुरळ घातली. सध्या हेडन ताडोबा मुक्कामी असून ताडोबातील जुनाबाई या वाघिणीसोबत तिच्या दोन शावकांनी मुक्त दर्शन दिले. सविस्तर वाचा…
‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात जागतिक प्रेम दिनी पाश्चिमात्यांचे अनुकरण न करता विद्यार्थ्यांना योग्य संदेश देता यावा म्हणून दरवर्षी प्रमाणे गोंडराजे यांचे समाधीस्थळी ‘सलाम राणी हिराई’ कार्यक्रमातून प्रेमाचे प्रतीक असलेल्या समाधीस्थळी विद्यार्थ्यांनी गुलाबी पुष्प अर्पण केले.
राज्यातील सत्तासंघर्ष आणि शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुमारे ४ तास सुनावणी पार पडली. आज शिवसेनेचे ( ठाकरे गट ) वकील कपिल सिब्बल, वकील अभिषेक मनु सिंघवी, वकील देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तीवाद केला आहे. उद्या ( १५ फ्रेब्रुवारी ) याप्रकरणी नियमीत सुनावणी पार पडणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलावे इतकी शिवसेना नेते संजय राऊत यांची उंची नाही आणि आता तर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. पवार यांच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस जे बोलले ते खरे आहे . सविस्तर वाचा…
मुंबईत दिवसेंदिवस विजेवर धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांना इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टतर्फे मुंबई शहर आणि उपनगरात ५५ इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
जर तुम्ही १० व्या अनुसूचीमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा राज्यघटनेच्या अन्य तरतुदींवर परिणाम होईल – ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी
“आधी विधानसभा अध्यक्षांबाबत निर्णय घ्यावा, मग १० व्या सूचीबद्दल – ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल
न्यायालयाने २४ जून रोजी दिलेला आदेश वादग्रस्त आहे. या आदेशामुळे सरकार पडलं. त्यानंतर १२ जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकलली गेल्याने आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय झाला नाही. – ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल
१३ फेब्रुवारी २०२३ ते २५ फेब्रुवारी २०२३ यादरम्यान नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील क्रीडा संकुल येथे १७ व्या डी.वाय. पाटील टी २० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डी.वाय. पाटील क्रीडा संकुलाचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांच्या नेतृत्वात दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. या विभागातील भाजपची लोकसभेचीसाठीची मांड भक्कम व्हावी म्हणून सलग दुसऱ्या वर्षी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर कल्याण लोकसभा क्षेत्रात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले आहेत. सविस्तर वाचा…
शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारातील शेतावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून सात लाख, आठ हजार रुपयांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
भारती विद्यापीठ, तसेच सहकारनगर भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरोधात पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले.
मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रियागार सहाय्यक पदांची भरती करताना १५ सेवाजेष्ठ चतुर्थश्रेणी कामगारांवर अन्याय करण्यात आला. मात्र आश्वासनाशिवाय पदरात काहीच पडत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. सविस्तर वाचा…
वर्धा : शरद पवार यांच्या उपस्थितीत युवा नेते समीर देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारा पक्षप्रवेश वेळेवर रोखण्यात आल्याची चर्चा बाहेर आली आहे.
नागपूरसह देशभरातील कलावंतांनी तयार केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित पेन्टिंग्जचे प्रदर्शन नागपूरमध्ये भरवण्यात आले असून त्यात मोदी यांच्या राजकीय प्रवासासोबतच त्यांची तुलना विष्णूशी करणाऱ्या पेन्टिंगजचाही समावेश आहे. सध्या हे प्रदर्शन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरू लागले आहे. सविस्तर वाचा…
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून दरवर्षी करण्यात येणाऱ्या नालेसफाईसाठी आगामी वर्षात २२६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मोठ्या आणि छोट्या नाल्यांसाठी प्रत्येकी ९० कोटी रुपये आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी ४६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सविस्तर वाचा…
सध्या बॉम्बस्फोट अथवा दहशतवादी हल्लांची खोटी माहिती देण्याचे पेव फुटले असून अशाच प्रकारे खोटी माहिती देणाऱ्या एका सराईत आरोपीला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षातून आरडीएक्स घेऊन दोन व्यक्ती आल्या असून ते डोंगरी परिसरात बॉम्बस्फोट घडविण्याबाबत चर्चा करीत असल्याची खोटी माहिती आरोपीने दारूच्या नशेत मुख्य नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून दिली होती. सविस्तर वाचा…
“ती” मरणाच्या दारात पोहचली होती. त्यातून ती वाचण्याची शक्यता नव्हतीच आणि वाचली तरी पूर्वायुष्याप्रमाणे जगू शकेल याचीही शाश्वती नव्हती. मात्र, दैव बलवत्तर आणि जगण्याची जिद्द यामुळे “ती” अवघ्या दहा दिवसात पूर्णपणे बरी झाली. तिच्या जोडीदाराला भेटली आणि त्यांचा संसार पुन्हा नव्याने सुरू झाला. सविस्तर वाचा…