Supreme Court Hearing on Maharashtra Power Struggle Updates : राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालायच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज ( १४ फेब्रुवारी ) सुनावणी होणार आहे. हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणीसाठी सोपवायचं की नाही, याबाबत यावेळी निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मी ७२ तासांचं सरकार स्थापन केलं होतं, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटत आहे. यासह देश, विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील विविध घडामोडी जाणून घेणार आहेत…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Live News, Political Updates : राजकीय, सामाजिक, मनोरंजन, अर्थकारण, क्रीडा क्षेत्रातील घडामोड एका क्लिकवर
जगातील पैशांशी संबंधित असणारी कदाचित पहिली तंत्रज्ञानातील क्रांती म्हणून एटीएम मशीनचा उल्लेख करणे वावगे ठरणार नाही. जॉन शेफेर्ड बर्रोर या माणसाने म्हणजे गुंतवणूकदाराने पहिल्यांदा असे काही तरी मशीन असावे असे मांडले. इंग्लंडमधील बारक्ले बँकेने ही संकल्पना उचलून धरली आणि १९६७ मध्ये जगातील पहिले एटीएम अस्तित्वात आले.
सरकारकडून गडचिरोलीच्या विकासाबाबत करण्यात येणारा दावा हा केवळ आकड्यांचा खेळ सून प्रत्यक्षात स्थिती भयावह आहे. येथील रस्ते,आरोग्य आणि रोजगाराची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. सूरजागड लोहप्रकल्पात स्थानिकांना रोजगार नाही. यातून केवळ मूठभर लोकांचा फायदा केल्या जात आहे. सविस्तर वाचा…
रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून ५९ वर्षांच्या महिलेची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार अंधेरी परिसरात घडला. महिलेच्या तक्रारीवरून या प्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध अंधेरी पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
अमेरिकेतील न्यायालयाने सुरू केलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईमध्ये अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) हस्तक्षेप करण्याचे आणि कारवाईला स्थगिती मागण्याचे आदेश द्यावेत ही पंजाब अँड नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील फरारी आर्थिक गुन्हेगार नीरव मोदी याच्या बहिणीची मागणी मुंबईतील विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळली. सविस्तर वाचा…
Xiaomi ही एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. Xiaomi कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत आपला आणखी एक स्मार्टफोन लॉन्च करणार आहे . शाओमी कंपनीने Xiaomi 13 Pro बद्दल माहिती दिली आहे. कंपनी आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लवकरच लॉन्च करणार असून त्यापूर्वीच याचे फीचर्स समोर आले आहेत.वाचा सविस्तर बातमी
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीतील बाळकुम प्रकल्पामधील विजेत्यांना अखेर घराची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला म्हाडा उपाध्यक्षांनी मंजुरी दिली असून लवकरच यासंबंधीचा आदेश जारी करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…
सर्वोच्च न्यायालयात आज ( १४ फेब्रुवारी ) शिवसेनेच्या फुटीप्रकरणी सुनावणी पार पडणार आहे. त्यावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलं आहे. “सात न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन करण्यात यावे, अशी ठाकरे गटाची मागणी आहे. त्या मागणीला आधार म्हणून नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला दिला आहे. या प्रकरणाचा फेरविचार करायचा असेल तर सात न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन करण्यात यावं, अशी ही मागणी आहे. सुरुवातीला या मुद्द्यावर सुनावणी होईल. जर ही मागणी मान्य झाली, तर मग सुनावणी तहकूब होऊन पुढची तारीख मिळू शकते. सर्वोच्च न्यायालयाला हे घटनापीठ स्थापन करायचे असेल, तर त्यात कोणकोणते न्यायाधीश असावेत, हे सरन्यायाधीशांना ठरवावे लागेल,” असं उज्जल निकम यांनी सांगितलं.
तरुणीची छेड काढणार्या एका तरुणाला माय-लेकीने भर रस्त्यात चोप दिला आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला नालासोपारा येथे ही घटना घडली. या मारहाणीची चित्रफित सध्या वायरल झाली आहे.
खासगी आणि असंघटित क्षेत्रात नोकरी करणाऱ्या चाकरमान्यांना पूर्ण निवृत्ती वेतन (पेंशन) हवे असल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पर्याय अर्ज (ऑप्शन फॉर्म) आपल्या कंपनीकडे, मालकाकडे भरून द्यायचे आहेत. असा अर्ज करण्याची मुदत ३ मार्च २०२३ पर्यंत आहे. सविस्तर वाचा…
अजित पवार महाविकास आघाडीचे नेते म्हणून महाराष्ट्रात वातावरण निर्माण करत, भाजापाला आव्हान देत आहेत. तेव्हा सर्वांच्या प्रतिमेला तडे देण्यासाठी खोठी विधानं फडणवीस यांच्याकडून केली जात आहेत. तरी, लोकांचा विश्वास बसणार नाही. पहाटेच्या शपथविधीच्या आठवणीने फडणवीसांना अजूनही डचकून जाग येते. याची कारण शोधत उपचार करून घेतले पाहिजेत, असा टोमणा शिवसेना खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
पाचपाखाडी येथील महापालिकेच्या शहीद उद्यानात नागेंदर यादव (२८) यांनी झाडाला मफलरच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला आहे. नागेंदर याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
शेअर्स कसे निवडावेत किंवा शेअर्स निवडताना इतर कुठले निकष लावावेत, असे प्रश्न विचारले होते. दर महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत.
राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, या व इतर मागण्यासाठी राज्यातील १७ लाख कर्मचारी, शिक्षक १४ मार्चपासून बेमुदत राज्यव्यापी संप करणार आहेत. सविस्तर वाचा…
एका तरुणीचे दोन तरुणांवर प्रेम जडले. दोघांनीही तिला व्हॅलेंटाईन आठवड्यात प्रेयसीला ‘टेडी’ गिफ्ट देण्याचे ठरवले. तिला अचानक भेटून आश्चर्यचकित करण्याची योजना एका प्रियकराने आखली तर दुसऱ्या प्रियकराने तिला वेळ घेऊन भेटायचे ठरवले. दोघेही प्रियकर एकाच वेळी ‘टेडी’ घेऊन तिला भेटायला आले आणि घोळ झाला. सविस्तर वाचा…
विविध तपास यंत्रणा आणि पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भारतीय जनता पक्ष हा विरोधी पक्षातील कुणबी-मराठा समाजाच्या नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करीत असल्याने या समाजात असंतोषाची भावना आहे. याचा फटका भाजपला येणाऱ्या निवडणुकांमध्ये बसण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…
एका अवजड वाहनाने तीन बाइकस्वारांना धडक दिल्याने त्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी जवळील एशियन पेट्रोल पंपच्या मार्गिका बदलण्यासाठी असणाऱ्या मोकळ्या जागेत (मिडीयम कट) आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडला.
भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील पाच वर्षांच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार शिगेला पोहोचला. भाजपाच्या नगरसेवकांनी अंदाजपत्रक विकण्याचा प्रकारही केला. महापालिकेतील इतिहासात असा प्रकार कधीच घडला नव्हता, असा आरोप महाविकास आघाडीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार, रवींद्र धंगेकर यांनी येथे केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जगातलील दहावं आश्चर्य आहे. आधीची आठ आश्चर्य जगात आहे. दोन आश्चर्य दिल्लीत बसले आहेत. दहावं आश्चर्य महाराष्ट्रात आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत तुम्ही विश्वासघात केला, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे काल सायंकाळी संगमनेर येथे आगमन झाले. बाळासाहेब थोरात हे सत्यजीत तांबे यांच्यासह संगमनेरमध्ये आले असताना कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी संपन्न झालेल्या जाहीर सभेत थोरात यांनी चौफेर टोलेबाजी केली. नाशिक पदवीधर निवडणूक, त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी झालेला संघर्ष, राजीनामा नाट्य या सर्व विषयांवर थोरात यांनी भाष्य केले. तसेच आपला भाचा सत्यजित तांबेबद्दलही ते मन मोकळं करुन बोलले. यावेळी त्यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे सत्यजीत हे काँग्रेसमध्ये पुनरागमन करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लोकसभा सचिवालयाने काँग्रेस नेते राहुल गांधींना हक्कभंगाची नोटीस बजावली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले होते. पण, राहुल गांधींनी केलेली विधाने दिशाभूल करणारी, अपमानास्पद, असभ्य, असंसदीय आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारी आहेत, असे लोकसभा सचिवालयाने पाठविलेल्या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. यावरून शिवसेनेने पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे. हा तर डरपोकपणा आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. खेडजवळ अज्ञात कारने आठ महिलांना धडक दिली आहे. या धडकेत पाच महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी ( १३ फेब्रुवारी ) रात्री ११ च्या सुमारास हा अपघात झाला आहे. याप्रकरणी खेड पोलीस अज्ञात कारचा शोध घेत आहेत.