Supreme Court Hearing on Maharashtra Power Struggle : राज्यातील सत्तासंघर्षावर काल (मंगळवारी १४ फेब्रुवारी ) सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. तसेच त्यांनी नबाम रेबिया प्रकरणावरही महत्वाचं भाष्य केलं. याबरोबरच सत्तासंघर्षाची सुनावणी सात सदस्यीय घटनापीठापुढे घेण्यात यावी, अशी मागणीही ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली. दरम्यान, आज पुन्हा याप्रकरणी सुनावणी सुरू पार पडली. आज शिंदे गटाकडून त्यांची बाजू मांडण्यात येत आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असेल. याप्रकरणाचे प्रत्येक अपडेट इथे वाचू शकता.

Live Updates

Maharashtra  News, Political Updates : नबाम रेबिया निकालाला ठाकरे गटाचे आव्हान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

18:13 (IST) 15 Feb 2023
नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील कापड कारखान्याला भीषण आग, कामगार आत अडकल्याची भीती

नवी मुंबई : आज संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास तुर्भे एमआयडीसीतील एका कापड कारखान्याला भीषण आग लागली असून, आत काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कापड कारखाना असल्याने काही क्षणात पूर्ण कारखान्यात आग पसरली असून, पूर्ण परिसरात धूर झाला आहे.

सविस्तर वाचा...

17:47 (IST) 15 Feb 2023
नवी मुंबई : शाळांत क्रमांकासह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा मोर्चा, मागण्या मान्य न केल्यास परीक्षेवर बहिष्काराचा इशारा

नवी मुंबई :  नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांना वेतन प्रक्रिया सुरू होण्यासाठी शाळांत क्रमांक दिला जात नसल्याने वर्षानुवर्ष विना वेतन काम करावे लागत असल्याचा आरोप करीत मुंबई विभागीय मंडळावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यात दोनशेपेक्षा अधिक शिक्षकांचा सहभाग होता.

सविस्तर वाचा...

17:46 (IST) 15 Feb 2023
पुणे : कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पुण्यातील ११ हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ३० हजार गुन्हेगारांची यादी तयार

कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी शहरातील दहा हजार ९७३ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोयते उगारुन दहशत माजविणे, खून, घरफोडी, साखळी चोरी अशा गुन्ह्यांतील दहा हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

17:35 (IST) 15 Feb 2023
आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व खात्याची परवानगी

पुरातत्व खात्याने आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिली आहे. पुरातत्व खात्याच्या या निर्णयानंतर देशभरातील शिवप्रेमींकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

17:04 (IST) 15 Feb 2023
डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा हरितपट्ट्यातील घरांची कल्याणमध्ये दस्त नोंदणी; महावितरणकडून थेट वीज पुरवठा

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा येथील हरितपट्ट्यात उभारण्यात आलेल्या १० बेकायदा इमारतींमधील घर खरेदी विक्रीचे दस्त नोंदणीकरण कल्याणमधील रामबागमधील दस्त नोंदणी कार्यालयात करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

सविस्तर वाचा...

16:34 (IST) 15 Feb 2023
ठाणे : रस्त्यावरील भंगार गाड्या हटविण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश, १४ भंगार गाड्या पालिकेने हटविल्या

ठाणे : महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर वर्षोनुवर्षे उभ्या असलेल्या भंगार गाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या असून, या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रस्त्यावरील भंगार वाहने हटविण्याची कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सविस्तर वाचा...

16:06 (IST) 15 Feb 2023
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. आज शिंदे गटाचे वकील हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी बाजू मांडल्यानंतर राज्यपालांच्यावतीने तुषार मेहता यांनी बाजू मांडली. मात्र, न्यायालयाची वेळ संपल्याने सुनावणी स्थगित करण्यात आली. त्यामुळे सत्तासंघर्षाची सुनावणी पाच सदस्यांच्या घटानापीठाकडून सात सदस्यांच्या घटनापीठाकडे जाईल का? याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.

16:02 (IST) 15 Feb 2023
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १८ आणि १९ फेब्रुवारीला पुणे दौर्‍यावर, आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टीचे करणार लोकार्पण

भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे १८ आणि १९ फेब्रुवारीला पुणे दौर्‍यावर असणार आहेत. या दोन दिवसांदरम्यान ते अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहतील. त्यामध्ये प्रामुख्याने आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टी लोकार्पण सोहळा याचा समावेश आहे. तसेच, भाजपाचे खासदार गिरीश बापट यांची ते भेट घेणार आहेत.

सविस्तर वाचा...

16:01 (IST) 15 Feb 2023
नात्याला काळीमा! खाटीक पित्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पनवेल – खांदेश्वर वसाहतीमध्ये एका खाटिकाने स्वत:च्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसांत नराधम बापाविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

सविस्तर वाचा...

14:10 (IST) 15 Feb 2023
मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त बेस्टची विशेष बस सेवा

महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक कान्हेरी लेणी आणि बाबुलनाथ मंदिराला भेट देतात. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने १८ फेब्रुवारी रोजी बोरिवली (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणी आणि दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या भाविकांसाठी  विशेष बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचा…

14:09 (IST) 15 Feb 2023
नवी मुंबई : ध्वनी प्रदुषण प्रकरणी भारतीय कंटेनर निगमवर कारवाई; महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने बजावली कारणे दाखवा नोटीस

वाशी सेक्टर २६ येथील तुर्भे रेल्वे यार्डात सिमेंट भराई मशिन मुळे ध्वनी प्रदुषण होत असल्याबाबत  महाराष्ट्र  प्रदूषण मंडळाने सदर आवाज कमी तसेच या प्रकल्पाबाबत आवश्यक उपाय योजना करण्याच्या सूचना रेल्वे यार्ड व्यवस्थापकांना दिल्या होत्या.मात्र सदर सूचना देवून ही परिस्थिती जैसे थेच असल्याने अखेर प्रदूषण मंडळाने भारतीय कंटेनर निगमला कारणे दाखवा नोटीस बजावली . सविस्तर वाचा…

14:07 (IST) 15 Feb 2023
नाशिक: सिटीलिंकचा प्रवास आजपासून महाग ; मध्यरात्रीपासून नवीन भाडेवाढ लागू

महानगरपालिकेच्या सिटीलिंक या शहर बस सेवेचा तोटा भरून काढण्यासाठी केलेली सुमारे सात टक्के भाडेवाढ बुधवारी मध्यरात्रीपासून लागू होत आहे. त्यामुळे प्रवाश्यांच्या खिशावर अधिकचा भार पडणार आहे. सविस्तर वाचा…

14:07 (IST) 15 Feb 2023
शिवजयंती मिरवणूक : कर्कश ध्वनियंत्रणा, गुलालास मंडळांचा नकार, फलकांवरील मजकूर, छायाचित्रांसाठी परवानगी आवश्यक

शिवजयंतीनिमित्त रविवारी शहरातील वाकडी बारव आणि नाशिकरोड येथून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत कर्कश ध्वनियंत्रणा (आवाजाच्या भिंती) आणि गुलालाचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला. सविस्तर वाचा…

14:06 (IST) 15 Feb 2023
महासंघाद्वारे शेतकऱ्यांचा तिसगाव धरणातील पाण्यावर हक्क; थेट जलवाहिनी, ठिबक सिंचनाचा अनोखा प्रकल्प

दिंडोरी आणि चांदवड या दोन तालुक्यांमधील १२ गावातील शेतकऱ्यांनी तिसगाव धरणावर महासंघाची स्थापना करून वाघाड पाठोपाठ या धरणातील पाण्यावर आपला हक्क प्रस्थापित केला आहे. थेट जलवाहिनीद्वारे आणि पूर्णत: ठिबक सिंचनाचा हा प्रकल्प दोन तालुक्यातील शेतीला संजीवनी देणारा ठरणार आहे. सविस्तर वाचा…

14:04 (IST) 15 Feb 2023
नमामि गोदातील प्रस्तावित कामे सिंहस्थापूर्वी करण्याचे नियोजन ; गोदावरीचा नदीकाठावरील शहरांच्या मित्र गटात समावेश

गोदावरीला प्रदुषणमुक्त करण्यासाठी नदीला येऊन मिळणाऱ्या सर्व १९ नाल्यांमधून येणारे दुषित पाणी थांबवून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. नदी किनारी सौंदर्यीकरणासाठी नमामि गोदावरी प्रकल्प अहवाल निर्मितीचे काम तीन महिन्यात पूर्ण होईल. सविस्तर वाचा…

13:12 (IST) 15 Feb 2023
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर आक्रमक कारवाई; रस्ते, पदपथ मोकळे

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील दीडशे ते दोनशे मीटर परिसरात एकही फेरीवाला बसणार नाही यादृष्टीने पालिकेच्या ग आणि फ प्रभागाने दररोज सकाळ, संध्याकाळ कारवाई सुरू केली आहे. या सततच्या कारवाईमुळे रेल्वे स्थानक भागातील रस्ते मोकळे राहत असल्याने पादचारी समाधान व्यक्त करत आहेत.

सविस्तर वाचा...

12:46 (IST) 15 Feb 2023
डोंबिवलीत ‘बहुरुपी’ पोलिसांच्या त्रासाने व्यावसायिक, व्यापारी हैराण; पाठलाग केल्यानंतर बहुरुपी गेले पळून

डोंबिवली – पोलिसांचा गणवेश धारण करून ‘बहुरुपी’ शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरत आहेत. व्यापारी, आस्थापना, कार्यालयांमध्ये गटाने जाऊन अस्वस्थतेचे वातावरण निर्माण करत आहेत. या बहुरुपी पोलिसांचा बंदोबस्त पोलिसांनीच करण्याची जोरदार मागणी व्यापारी, व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा...

12:38 (IST) 15 Feb 2023
नबाम रेबिया प्रकरण इथे लागू करता येईल का? यावर युक्तिवाद करा - सर्वोच्च न्यायालय

नबाम रेबिया प्रकरण इथे लागू करता येईल का? यावर युक्तिवाद करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. बहुमत चाचणी थांबवण्यास नकार दिल्यानंतर उद्धव ठाकरेंपुढे दोन मार्ग होते. मात्र, त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, असेही न्यायालयाने म्हटले.

12:23 (IST) 15 Feb 2023
आम्हीच खरी शिवसेना, आमच्याकडे बहुमत आहे - नीरज कौल

पंक्षांतर्गत वाद हा लोकशाहीचा भाग आहे. पक्षाच्या नेत्याला हटवण्यासाठी हा संघर्ष आहे. त्यामुळे घटनेच्या १० व्या अनुसूचीनुसार कारवाई करता येणार नाही. आम्हीच शिवसेना आहोत, आमच्याकडे बहुमत आहे, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी केला.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1625746460485779458?s=20&t=81DuNFSjhSJkSBpZqrEe-w

12:22 (IST) 15 Feb 2023
कुर्ल्यातील इमारतीत भीषण आग ; वृद्ध महिलेचा मृत्यू

कुर्ल्यामध्ये एका १२ मजली इमारतीत बुधवारी सकाळी ७ वाजता भीषण आग लागली. चौथ्या मजल्यापासून दहावा मजल्यापर्यंत धुराचे लोट पसरल्यामुळे रहिवासी वेगवेगळ्या मजल्यांवर अडकून पडले होते. या दुर्घटनेत एका ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सविस्तर वाचा…

12:20 (IST) 15 Feb 2023
हतनूर धरण जलाशयावर १४९ पक्षी प्रजातींची नोंद; वनपरिक्षेत्र अधिकारी, चातक निसर्ग संवर्धन संस्थतर्फे आशियाई पाणपक्षी गणना

हतनूर धरणाच्या जलाशयावर आशियाई पाणपक्षी गणनेत १४९ पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली. याप्रसंगी स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांचाही अभ्यास करण्यात आला. त्यात 35 पक्षी निरीक्षकांनी सहभाग नोंदविला. सविस्तर वाचा…

12:19 (IST) 15 Feb 2023
वर्धा :…म्हणून ८० वर्षांच्या गांधीवाद्याचे उपोषण

गांधीवाद्यांतील गटबाजी संपुष्टात यावी म्हणून एका अंशी वर्षीय गांधीवाद्याने चक्क गांधीप्रणीत आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष असलेले आबा कांबळे आता एकजूट झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निश्चय ठेवून आहेत.

सविस्तर वाचा…

12:18 (IST) 15 Feb 2023
नागपूर : ‘एमबीबीएस’ला प्रवेश पाहिजे, ५० लाख द्यावे लागतील…

बारावीत कमी गुण मि‌ळाले. मुलीला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पूर्ण होणार नसल्यामुळे वडिलांना लाखो रुपये खर्च करण्याची तयारी दर्शविली. मुलीला ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून तामिळनाडूतील ठकबाजांनी ५२ लाख उकळून फसवणूक केली. सविस्तर वाचा…

12:18 (IST) 15 Feb 2023
बीबीसीच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा, पुण्यात केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे मूक आंदोलन

केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वाचा...

12:17 (IST) 15 Feb 2023
शिवसेनेतील बहुसंख्य आमदारांची उद्धव ठाकरेंवर नाराजी- नीरज कौल

शिवसेनेतील बहुसंख्य आमदारांची उद्धव ठाकरेंवर नाराजी होती. पक्षांतर्गत नाराजीचा विचार व्हायला हवा, असेही कौल म्हणाले.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1625746788169940992?s=20&t=81DuNFSjhSJkSBpZqrEe-w

12:13 (IST) 15 Feb 2023
अविश्वास प्रस्ताव आणल्यास विधानसभा उपाध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाही - नीरज कौल

अविश्वास प्रस्ताव आणल्यास विधानसभा उपाध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाही. आमदार अपात्र ठरले तरी त्यांना मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही. बनावट कथनामुळे हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठापुढे देता येणार नाही, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी केला आहे.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1625744423635255297?s=20&t=Fv_TG_xuVwgI2g9NrQP49g

12:10 (IST) 15 Feb 2023
नबाम रेबिया प्रकरण योग्य की अयोग्य हे राजकीय स्थितीवर ठरतं - सर्वोच्च न्यायालय

नबाम रेबिया प्रकरण योग्य की अयोग्य हे राजकीय स्थितीवर ठरतं, अशी टीप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1625742421479895040?s=20&t=Fv_TG_xuVwgI2g9NrQP49g

12:03 (IST) 15 Feb 2023
अविश्वास प्रस्ताव आणल्यास विधानसभा उपाध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाही - नीरज कौल

अविश्वास प्रस्ताव आणल्यास विधानसभा उपाध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाही. आमदार अपात्र ठरले तरी त्यांना मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही. बनावट कथनामुळे हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठापुढे देता येणार नाही, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी केला आहे.

12:00 (IST) 15 Feb 2023
हरीश साळवे यांचा युक्तिवाद पूर्ण; शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद सुरू

हरीश साळवे यांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता शिंदे गटाचे वकील नीरज कौल युक्तिवाद करत आहेत.

11:59 (IST) 15 Feb 2023
पक्षाचा विश्वास गमावलेल्या नेत्यासाठी पक्षांतर विरोधी कायदा नाही - हरीश साळवे

पक्षाचा विश्वास गमावलेल्या नेत्यासाठी पक्षांतर विरोधी कायदा नाही. यात

राजकीय नैतिकतेचे अनेक पैलू आहेत. हा केवळ चर्चात्मक मुद्दा नाही, असेही हरीश साळवे म्हणाले.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1625741380650672129?s=20&t=2beogONCiQFkkfnR7RzQEQ

supreme court

प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता

मंगळवारी उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, त्यांनी नबाम रेबिया निकालास आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे गटाच्या वतीने बुधवारी मांडणी केली जाणार आहे.

Story img Loader