Supreme Court Hearing on Maharashtra Power Struggle : राज्यातील सत्तासंघर्षावर काल (मंगळवारी १४ फेब्रुवारी ) सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. तसेच त्यांनी नबाम रेबिया प्रकरणावरही महत्वाचं भाष्य केलं. याबरोबरच सत्तासंघर्षाची सुनावणी सात सदस्यीय घटनापीठापुढे घेण्यात यावी, अशी मागणीही ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली. दरम्यान, आज पुन्हा याप्रकरणी सुनावणी सुरू पार पडली. आज शिंदे गटाकडून त्यांची बाजू मांडण्यात येत आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असेल. याप्रकरणाचे प्रत्येक अपडेट इथे वाचू शकता.
Maharashtra News, Political Updates : नबाम रेबिया निकालाला ठाकरे गटाचे आव्हान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष
विकासकांनी आता अशा प्रकारे घराचा ताबा देताना एक वा दोन वर्षांच्या देखभाल खर्चाची मागणी ग्राहकांकडून करणे हे रेरा कायद्यातील तरतुदींशी संपूर्णपणे विसंगत आहे, असा दावा मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते, तर काही मुद्दे उपस्थित करता आले असते. मात्र, त्यांनी त्यापूर्वीच राजीनामा दिला. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या राजीनामा अवैध ठरवला, तरच या चर्चांना अर्थ उरेल, असेही हरीश साळवे म्हणाले.
Salve: If Mr Thackeray had contested the election, some question of law may have arisen. Your lordships will have to declare the resignation illegal. That's the only way he can come back.#SupremeCourtOfIndia #SupremeCourt #Shivsena
— Live Law (@LiveLawIndia) February 15, 2023
गोंदिया शहरानजीक असलेल्या रामनगर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या सुर्याटोला येथे जावयाने आपल्या सासऱ्यासह पत्नी व मुलाला पेट्रोल घालून जाळल्याची घटना बुधवारच्या रात्री १ वाजेदरम्यान घडली.या घटनेत आरोपीचा सासरा देवानंद मेश्राम वय ५४ रा.सुर्याटोला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सविस्तर वाचा…
बहुसंख्य आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. सरकार कोसळण्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा युक्तिवादही साळवे यांनी केला
जर रेबिया प्रकरणाचा हवाला चुकीचा असेल तर विरोधकांना त्यांची याचिका मागे घ्यावी लागेल, असा युक्तिवादही हरीश साळवे यांनी केला.
Salve: If they say that the judgement is wrong, they just have to withdraw their petitions.#SupremeCourtOfIndia #SupremeCourt #Shivsena

आमदारांना २५ जूनपर्यंत अपात्रतेची नोटीस बजावली होती. विधानसभा उपाध्यक्षांनी त्यांना उत्तरासाठी पुरेसा वेळ दिला नाही, असेही हरीश साळवे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा दिला. त्यांना राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावलं होतं. २८ जून रोजी ही बहुतच चाचणी होणार होती. मात्र, त्यांनी त्यापूर्वी राजीनामा दिला, असा युक्तिवादही हरीश सावळे यांनी केला.
कायदा पक्षांतर बंदीसाठी आहे, मतभेदांसाठी नाही, असा युक्तीवाद हरीस साळवे यांनी केला आह. तसेच पक्षांतर बंदी कायद्यामुळे देशात पक्षांतर थांबलेलं नाही, असं ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे बाजू मांडत आहे.
CJI DY Chandrachud: Just to have an idea. Mr Salve will go first, then Mr Kaul, Mr Jethmalani…Mr Salve, you're opposing the reference?

Sr Adv Harish Salve: Yes. The issues which have now transpired are such that there is no need for reference #SupremeCourtOfIndia #Shivsena
नागपूर : एकीकडे प्रदेश काँग्रेसमध्ये दोन नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी पक्षश्रेष्ठीला हस्तक्षेप करावा लागत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदियात एका व्यासपीठावर येत परस्परांवर स्तुतीसुमने उधळल्याने तर्कवितर्क केले जात आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) बसेस सुस्थितीत असल्याचा दावा केला जातो. परंतु काहींची डिक्की लॉक तर काहींची स्थिती वाईट असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ‘एसटी’तून पार्सल वाहतुकीसाठीचे कंत्राट मे. किसनलाल गेहिराम ॲन्ड कंपनीकडे दिले गेले. सविस्तर वाचा…
पुणे : वीज मीटर घेण्यासाठी दाखल अर्जातील हरकतीवर अनुकूल अहवाल देण्यासाठी ४० हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या विधी सल्लागारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. रास्ता पेठेतील महावितरणच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली.
अलिबाग : अलिबाग नगर पालिकेच्या डंपिंग ग्राउंड परिसरात लावलेल्या आगीमुळे रात्रीपासून शहर आणि लगतच्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे रात्रीपासूनच अलिबागकरांचा श्वास कोंडला होता. सकाळी दहा वाजेपर्यंत शहरातील अनेक भागांत धुराचे साम्राज्य पसरले होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
सूरजागड टेकडीवर लोह खनिजाचे उत्खनन सुरू होऊन वर्ष उलटले. विकास होणार मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार अशा घोषणा शासन प्रशासनाकडून करण्यात आल्या. मात्र, या घोषणा कागदावर असून केवळ २ स्थानिकांना कायमस्वरूपी रोजगार मिळाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सविस्तर वाचा…

१६ वर्षीय मुलाने रागाच्या भरात आपल्या व्यसनाधीन वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी जुने शहर पोलीस ठाण्यांतर्गत गंगानगर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना माझ्या अटकेचा डाव रचण्यात आला, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावरून खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीसांची जुनी भाषणं काढून बघा, आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालणारी लोकं आहोत, असं फडणवीस त्या भाषणांत म्हणाले होते. मग वाघाच्या जबड्यात हात घालणारे अटकेला का घाबरत होते, असे राऊत म्हणाले.
अमरावती शहरातील गरीब, गरजू मुलींना पैशांचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात फासल्यानंतर त्यांची लग्नासाठी परप्रांतात विक्री करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात गाडगेनगर पोलिसांना मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी यश मिळाले. या प्रकरणात ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार महिलेसह तिचे अन्य साथीदार फरार असून, त्यांचा कसून शोध घेतल्या जात आहे.
लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्यातून पीडित मुलीला गर्भधारणा झाली. ही धक्कादायक घटना खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…
पहाटेच्या शपथविधीबाबतचे फडणवीस यांचे वक्तव्य पुणे जिल्ह्यातील विधानसभा पोटनिवडणुकीवर डोळा ठेवून करण्यात आले आहे. केवळ दोन दिवसांच्या सरकारला शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते पाठिंबा देतील, यावर विश्वास बसत नाही, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नागपुरात व्यक्त केले. सविस्तर वाचा…
पुणे : खवय्यांची पसंती असलेल्या हापूस आंब्याचे पुण्यात आगमन झाले आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात हापूस आंब्यांची तुरळक आवक सुरू झाली असून, कोकणातून दररोज १० ते १५ पेट्यांची आवक होत आहे. हापूस आंब्यांचा हंगाम नियमित सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी लागणार आहे.
पुणे : नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅलमधील व्यापाऱ्याकडून माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या सराइतासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली.
मंगळवारी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद पूर्ण केला अजून आज शिंदे गटाचे वकील हरिश साळवे युक्तीवाद करणार आहेत.
मतदारांमध्ये कमालीचा संताप आहे. शिवसेनेविषयी सहानुभूती आहे. त्यामुळे उद्या पुण्यातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होईल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
राज्याच्या सत्तासंघर्षांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यांच्या घटनापीठाकडे सुपूर्द करण्यासंदर्भात मंगळवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर युक्तिवाद झाला. उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, त्यांनी नबाम रेबिया निकालास आव्हान दिले आहे.
मंगळवारी उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, त्यांनी नबाम रेबिया निकालास आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे गटाच्या वतीने बुधवारी मांडणी केली जाणार आहे.