राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर केला आहे. मलिक यांना दोन महिन्यांसाठी हा जामीन देण्यात आला आहे. अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात २३ फेब्रुवारी २०२२ रोजी नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. परंतु, किडनीशी संबंधित दुर्धर आजाराने मलिक यांना ग्रासलं आहे. त्यावरील उपचारांसाठी मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन देण्यात आला आहे.

दरम्यान, नवाब मलिक तुरुंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. ते तुरुंगात जाण्यापूर्वी राष्ट्रवादी पक्ष एकसंघ होता. पंरतु, आता या पक्षात अजित पवारांचा एक आणि शरद पवारांचा एक असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता तुरुंगातून बाहेर आल्यावर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Sharad Pawar on age
Sharad Pawar : “मी काय म्हातारा झालोय का? इथं एक म्हातारं…”, शरद पवारांचा मिश्किल सवाल; म्हणाले, “या लोकांच्या हाती…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
woman police brutally beaten by brother in law in kalyan
कल्याणमध्ये महिला पोलिसाला दिराकडून बेदम मारहाण
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
भाजपाच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवरून शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “सत्ताधाऱ्यांची मानसिकता…”
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”

नवाब मलिक काही वेळाने रुग्णालयातून बाहेर पडणार आहेत. तत्पूर्वी रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, नवाब मलिक यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार सुळे यांना विचारलं की आता नवाब मलिक कोणत्या गटात जाणार आहेत? त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, याची मला काहीच माहिती नाही. मी येथे पक्ष किंवा राजकारणी म्हणून नव्हे तर माझ्या मोठ्या भावाला भेटायला आले आहे. माझ्या भावाला न्याय मिळाला आहे, त्यामुळे मी इथे त्याला भेटायला आले आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांच्या स्वागतासाठी अजित पवार यांच्या गटाचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी कार्यकर्त्यांनी बोलावल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर नवाब मलिक यांची कन्या सना मलिक आणि कप्तान मलिक यांनी अलिकडेच अजित पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा >> “हुकूमशाही सरकारविरोधात रस्त्यावर उतरा”, सरन्यायाधीश चंद्रचूड असं म्हणाले? सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं…

दरम्यान, नवाब मलिक यांना भाजपाकडून ऑफर असल्याची चर्चा सुरू आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना रविवारी (१३ ऑगस्ट) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. त्यावर खडसे म्हणाले, ही गोष्ट येणारा काळच सांगू शकेल. यात एक गोष्ट मात्र नक्की आहे की नवाब मलिक हे जर भारतीय जनता पार्टीत गेले तर तिथे जाऊन स्वच्छ होऊन ते बाहेर येतील. त्यामुळे एखाद्या वेळेस भाजपा त्यांना ऑफर देऊ शकते. कारण भारतीय जनता पार्टीकडे लोकांना स्वच्छ करण्याची मशीन आहे.